Join us

खतरों के खिलाडी ११ : फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव लीक; जाणून घ्या यंदाच्या पर्वात कोणी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:44 IST

Khatron ke khiladi 11: येत्या २५-२६ सप्टेंबरला या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वीच यंदाच्या पर्वातील विजेता स्पर्धकाचं नाव लीक झालं आहे.

ठळक मुद्देयंदाच्या ११ व्या पर्वाचं चित्रीकरण केपटाऊनमध्ये पार पडलं.

छोट्या पडद्यावरील स्टंट बेस रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. सध्या या शोचं ११ वं पर्व सुरु असून त्याचा ग्रँड फिनाले चांगलाच चर्चेत आला आहे. येत्या २५-२६ सप्टेंबरला या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वीच यंदाच्या पर्वातील विजेता स्पर्धकाचं नाव लीक झालं आहे. त्यानुसार, लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी यंदाच्या ११ व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर अर्जुनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'खतरों के खिलाडी ११' हा शो सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अर्जुन बिजलानी यांच्यात शेवटचा सामना रंगणार आहे. नुकतंच या ग्रँड फिनालेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. मात्र, हा भाग २५-२६ तारखेला प्रसारित केला जाणार आहे. परंतु, त्यापूर्वीच विजेत्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे.

त्यानुसार, अर्जुन बिजलानी खतरों के खिलाडी ११ चं पर्व जिंकला आहे. सोशल मीडियावर अर्जुनवर कौतुकाचा वर्षाव जरी होत असला तरीदेखील 'खतरों के खिलाडी' या शोकडून अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, यंदाच्या ११ व्या पर्वाचं चित्रीकरण केपटाऊनमध्ये पार पडलं. यात अंतिम फेरीपर्यंत ६ स्पर्धक पोहोचले होते. यातच दिव्यांका त्रिपाठी, राहुल वैद्य, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, विशाल आदित्य सिंह आणि श्वेता सिंह या स्पर्धकांचा समावेश होता. 

टॅग्स :खतरों के खिलाडीदिव्यांका त्रिपाठीरोहित शेट्टी