Join us  

'खतरों के खिलाडी'मध्ये गश्मीरचा खतरनाक स्टंट, तोंडाने जिवंत किडे उचलले अन्...; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 2:43 PM

'खतरों के खिलाडी १४'मधील गश्मीरचा एका स्टंट दरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. 

'खतरों के खिलाडी'चा नवा सीझन अलिकडेच सुरू झाला आहे. 'खतरों के खिलाडी १४'मध्ये मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीदेखील सहभागी झाला आहे. या शोमध्ये स्टंट करून गश्मीर चाहत्यांची मनं जिंकत आहे. 'खतरों के खिलाडी १४'मधील गश्मीरचा एका स्टंट दरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. 

गश्मीर हा अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेस आणि पिळदार शरीरयष्टीसाठीदेखील ओळखला जातो. मराठी सिनेसृष्टीच्या या  हँडसम हंकने हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अभिनयाने गश्मीरने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. गश्मीर हा उत्तम डान्सर असल्याचं झलक दिखला जा मध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. पण, आता गश्मीरची एक नवी बाजू चाहत्यांच्या समोर आली आहे. 'खतरों के खिलाडी'मधील गश्मीरचे स्टंट पाहून तो खतरनाक खिलाडी असल्याचं चाहते म्हणत आहे. 'खतरों के खिलाडी'मधील गश्मीरचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांची झोपच उडाली आहे. 

कलर्स टीव्हीच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरुन गश्मीरचा 'खतरों के खिलाडी' शोचा एक नवा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गश्मीर जिवंत किडे तोंडाने उचलून पाईपमध्ये टाकताना दिसत आहे. 'खतरों के खिलाडी'चे स्पर्धकही गश्मीरचा हा स्टंट बघून आश्चर्यचकित झाले आहेत. रोहित शेट्टीही त्याच्या स्टंटने प्रभावित झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :गश्मिर महाजनीखतरों के खिलाडीमराठी अभिनेता