'देवमाणूस' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर 'तू चाल पुढं' मालिकेतील अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याने पोस्ट शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली. शुक्रवारी त्यांचा साखरपुडा, हळद आणि संगीत कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज किरण आणि वैष्णवी विवाहबंधनात अडकणार आहेत.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरची १३ डिसेंबरला सकाळी साखरपुडा पार पडला. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता आणि रात्री संगीत सोहळा पार पडला. या तिन्ही कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हळदीला किरणने व्हाइट रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तर वैष्णवीने हिरवा काट असलेली नारंगी रंगाची साडी नेसली होती. त्यानंतर संगीतच्या फंक्शनसाठी किरणने लाइट पर्पल रंगाची शेरवानी घातली होती आणि वैष्णवीने त्याच रंगाचा लेहंगा परिधान केला होता. संगीत सोहळ्यात त्या दोघांनी केक कट केला. तसेच त्यांच्याबद्दल सांगितले आणि एकत्र रोमॅंटिक अंदाजात डान्स करताना दिसले. त्यांच्या या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांचे चाहते त्या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या लग्नासाठी मराठी इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित आहेत.