Kiran Mane: ‘...लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’, किरण माने शुक्रवारी करणार मोठा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:45 PM2022-02-03T12:45:26+5:302022-02-03T12:46:23+5:30

Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याच्या प्रकरणात आता अजून नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. किरण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, त्यामध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Kiran Mane: ‘... I want to reveal, I want to reveal my secrets’, Kiran Mane will make a big secret blast on Friday | Kiran Mane: ‘...लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’, किरण माने शुक्रवारी करणार मोठा गौप्यस्फोट 

Kiran Mane: ‘...लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’, किरण माने शुक्रवारी करणार मोठा गौप्यस्फोट 

googlenewsNext

मुंबई - मुलगी झाली हो मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढण्यात आल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती. दरम्यान, किरण माने यांना त्यांच्या राजकीय पोस्टमुळे मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वादाला तोंड फुटले होते. तसेच किरण माने यांनी शरद पवार, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची भेट घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले होते. दरम्यान, या प्रकरणात आता अजून नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. किरण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, त्यामध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

याबाबत किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणाले की, हा आता माझा एकट्याचा लढा राहिलेला नाही. तुम्हा सगळ्यांचा झालाय. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्हाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुम्हाला कामावरून काढायची कुणाची छाती नाही झाली पाहिजे. कुठलीही स्त्री असो वा पुरुष. तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा विचार करेल, असं काहीतरी करून दाखवतो. तेही संविधानिक मार्गानं. बघाच तुम्ही, असा थेट इशारा किरण माने यांनी दिला आहे.

किरण माने पॅटर्न इथून पुढे तुमच्यावर कसलाही अन्याय होऊ देनार नाही.  पैशाचा, सत्तेचा, वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते ती म्हणजे 'संविधान'! मला वाटलं होतं की ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रणेचा 'अंतरात्मा' जागा होईल. कुठल्यातरी राजकीय नेत्याला आपला सोत्ताचा संघर्ष आठवेल. पन नाही, ९९% राजकीय नेते हे भांडलवलदारांचे गुलाम आहेत. माझ्यावर अन्याय करनारी यंत्रणा पैशांच्या धुंदीत आहे. "आपण राजकीय नेते खिशात घेऊन फिरतो. काहीही कारस्थान करू. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला." अशा मग्रूरीत  ही धेंडं आहेत, अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला. 

पण भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाही. जीवाचं रान करीन.. रक्ताचं पाणी करीन...होत्याचं नव्हतं करीन... पन न्याय मिळवूनच राहीन... जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तो तुम्हा सगळ्यांचा विजय असेल.  मेलो तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागेल. मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर "एS तुझा किरण माने करेन." असं सुनावलं जाईल.

पन काही म्हणा, या लोकांनी अन्याय करायला खूप  चुकीचा माणूस निवडला.  भावांनो, नाही नाही... लय हार्ड माणसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी ! नाय ह्यांना पळता भुई थोडी केली तर किरण माने नाव लावनार नाय, असा इशाराच किरण माने यांनी दिला. तसेच उद्या दुपारी साडे तीन वाजता प्रेस क्लबमध्ये प्रेस कॉन्फ्रन्स घेतोय जमलं तर या, असं आवाहन किरण माने यांनी केलं आहे. 

 

Web Title: Kiran Mane: ‘... I want to reveal, I want to reveal my secrets’, Kiran Mane will make a big secret blast on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.