Join us  

KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 8:35 AM

KKK 14 ची ग्रँड फिनालेची चर्चा झाली. या शोमध्ये गश्मीर महाजनीला हरवून करणवीर मेहराने ट्रॉफी जिंकली आहे

KKK 14 ची काल ग्रँड फिनाले होती. गेले महिनाभर 'खतरो के खिलाडी 14' ची चांगलीच चर्चा होती. अखेर काल ग्रँड फिनालेमध्ये 'खतरो के खिलाडी 14'चा विजेता घोषित करण्यात आला. करणवीर मेहरा 'खतरो के खिलाडी 14'चा विजेता झालाय. यामुळे मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची विजेता बनण्याची संधी थोडक्यात हुकली. विजेता झाल्यामुळे करणवीर मेहरावर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

करणवीर मेहराला मिळाली इतकी विजयी रक्कम

काल 'खतरो के खिलाडी 14'ची ग्रँड फिनाले झाली. रोहित शेट्टीने त्याच्या खास अंदाजात ही ग्रँड फिनाले होस्ट केली. यामध्ये करणवीर मेहराने 'खतरो के खिलाडी 14'चा विजयी किताब मिळवला. करणवीरला 'खतरो के खिलाडी 14'ची चमचमती ट्रॉफी आणि २० लाख रुपये प्राईज मनी मिळाली. याशिवाय नवी कोरी आलिशान हुंडाई क्रेटा गाडी करणवीरला बक्षिसाच्या स्वरुपात मिळाली. त्यामुळे 'खतरो के खिलाडी 14'चा विनर झाल्याने करणवीर मालामाल झालाय.

मराठमोळ्या गश्मीर महाजनीची संधी हुकली

'खतरो के खिलाडी 14' मध्ये मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सहभागी होता. गश्मीरने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दाखवत 'खतरो के खिलाडी 14'च्या फायनलपर्यंत मजल मारली. परंतु कमी फरकाने गश्मीरची विजेतेपदाची संधी थोडक्यात हुकली. जर मी ट्रॉफी जिंकली तर माझे सर्व केस उडवेन, अशी इच्छा त्याने फिनालेआधी व्यक्त केली होती. आता खरोखर करणवीर विजेता झाल्याने तो केस उडवणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान काल 'खतरो के खिलाडी 14' मध्ये आलिया भट तिच्या 'जिगरा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपस्थित होती.

टॅग्स :खतरों के खिलाडीगश्मिर महाजनीगश्मिर महाजनी