Join us

‘लेक माझी दुर्गा’ मालिकेतील दुर्गा नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 5:11 PM

Lek Majhi Durga New Marathi Serial : येत्या 14 तारखेपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेचं नाव आहे, ‘लेक माझी दुर्गा’

कर्लस मराठीवर (Colors Marathi ) येत्या 14 तारखेपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेचं नाव आहे, ‘लेक माझी दुर्गा’ (Lek Majhi Durga ).  हेमांगी कवी आणि अभिनेता सुशील इनामदार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या मालिकेत दुर्गा या चिमुकलीची कथा पाहायला मिळणार आहे. होय, ती या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. आता ही दुर्गाची ही भूमिका साकारणारी चिमुकली कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तिचं नाव आहे, निधी मयूर रासने  (Nidhi Gaurav Rasane).

याआधीही एका मालिकेत निधी दिसली होती. सोनी मराठीवरची ‘ज्ञानेश्वर माऊली’ ही मालिका तुम्ही पाहिली असेल तर त्यातली लहानपणीची मुक्ताई तुम्हाला आठवत असेलच. मुक्ताईची ही भूमिका निधीने अतिशय सुंदररित्या वठवली होती. तिच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं.आता हीच निधी ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत दुर्गाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मुंबईची निधी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली शाळेत शिकतेय. निधीचे वडील गौरव रासने यांनी ‘कोण होणार करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होते. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात निधी उत्स्फूर्तपणे सहभागी होती. यादरम्यान निधीची अभिनयक्षमता पाहून तिच्या आईवडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं आणि निधी टीव्ही मालिकेत झळकली.

‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेचे सर्व कथानक दुर्गाभोवती फिरताना दिसणार आहे.   ही मालिका हिंदी मालिके शक्तीचा रिमेक असल्याची चर्चा आहे. स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणारी दुर्गा बाबांना आपलेसे करणार का? असा विचार करणारी ही दुर्गा मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे.   

टॅग्स :कलर्स मराठीहेमांगी कवीटेलिव्हिजन