Join us

फुई आज्जीची बातच न्यारी...! ‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील ही आज्जी पाहा नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 8:00 AM

मराठी मालिकांमध्ये सध्या आज्यांची फारच चर्चा आहे. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील जिजी गाजली. यानंतर ‘देवमाणूस’ मालिकेतील सरू आज्जी कधी नव्हे इतकी फेमस झाली. आता काय तर फुई आज्जीने धम्माल केलीये.

ठळक मुद्देकल्पना सारंग यांनी टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला होता. ‘मन झालं बाजींद’ या मालिकेत त्यांनी रायाच्या आजीची भूमिका साकारली आहे.

मराठी मालिकांमध्ये सध्या आज्यांची फारच चर्चा आहे. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील जिजी गाजली. यानंतर ‘देवमाणूस’ मालिकेतील  सरू आज्जी कधी नव्हे इतकी फेमस झाली. आता काय तर फुई आज्जीने धम्माल केलीये. होय, नुकत्याच सुरू झालेल्या ‘मन झालं बाजिंद ’  ( Man Jhala Bajind ) या मालिकेतील ठसकेबाज फुई आज्जी सध्या चर्चेत आहे.  झी वाहिनीवरच्या या मालिकेतील तिचा गावरान ठसका पाहतांना मज्जा येते. मालिकेत रायाची भूमिका वैभव चव्हाण याने तर कृष्णाची भूमिका श्वेता खरात हिने साकारली आहे. कल्याणी चौधरी, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख यासारखे कलाकार या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पण फुई आज्जीची बातच न्यारी.

मालिकेत रायाच्या कुटुंबात ज्येष्ठ सदस्य असलेली फुई आज्जीचा दरारा काय सांगावा. आज याच फुई आज्जीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मालिकेत फुई आज्जीचे दिलखुलास पात्र साकारणा-या अभिनेत्रीचे नाव आहे  कल्पना सारंग (Kalpana Sarang). 

कल्पना सारंग यांना याआधी अनेक मराठी व हिंदी मालिका शिवाय चित्रपटांत तुम्ही बघितले असेल.   मराठी आणि हिंदी नाटकांतूनही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नाही तर काही रिअ‍ॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. ‘रायजिंग स्टार’ या रिअ‍ॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये कल्पना सारंग   रणवीर सिंग सोबत झळकल्या होत्या. अनेक जाहिरातीतही त्या दिसल्या आहेत.

शॉर्टफिल्म, आगरी सिंघम आणि डॅम्बिस म्हातारी, झी मराठीवरील भागो मोहन प्यारे, द परफेक्शनिस्ट, इन्स्पेक्टर चिंगम अशा विविध माध्यमातून आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कल्पना सारंग यांनी टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला होता. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत त्यांनी रायाच्या आजीची भूमिका साकारली आहे. राया आणि कृष्णा यांच्या लग्नासाठी ही फुई आज्जी काय काय प्रयत्न करते, ते येत्या भागांत पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनझी मराठी