Join us

असे झाले होते दीपिका चिखलीया यांचे सीतासाठी सिलेक्शन, द्यावे लागल्या होत्या इतक्या कठिण परिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 10:47 AM

जेव्हा टीव्हीवर झळकली तेव्हा साक्षात रामायणातील सीतेला रसिकांना देवीप्रमाणे पुजले आणि जिथे जिथे राम आणि सीता जायचे तिथे त्याच्या पायाल स्पर्श करून आशिर्वाद घेतला जायचा.

लॉकडाऊनदरम्यान रामायणने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सध्या सारेच घरातच बंदीस्त असल्यामुळे मनोरंजनासाठी रामायण सुरु झाले आणि सा-यांनाच पुन्हा ते सोनेर दिवस आठवले. तो काळ होता जेव्हा रामायण पाहण्यासाठी लोक बाहेरही पडत नसत. घरातच बसून रामायण पाहायचे तेच दिवस पुन्हा आल्याचा भास आज सा-यांना होतोय. आजही सारं कुटुंब हे रामायण बघण्यात दंग झाल्याचं चित्र आहे. रामायण सुरू झाल्यापासून पुन्हा एकदा या पौराणिक मालिकेतील कलाकारदेखील प्रकाशझोतात आले आहेत. 

 

यापैंकी सर्वाधिक चर्चा होतेय ती सीता साकारणारी दीपिका चिखिलीया यांची. यांनी सााकरेली सीता तर आजही रसिकांच्या हृदयात कायम आहे. पण यांच्याविषयीचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायणसाठी कलाकारांची निवड अतिशय कटाक्षाणे करण्यात आली होती. राम गवसला तर सीता पण त्याला साजेशी हवी होती. त्यामुळे सीतासाठी ऑडीशन सुरू झाले.

 

त्यावेळी वेशभूषा आणि डायलॉगमध्ये जोपर्यंत मला एखादी मुलगी सीतेच्या भूमिकेसाठी परफेक्ट वाटणार नाही तोपर्यंत मी कास्ट करणार नाही. असे रामानंद सागर यांनी सांगितले होते. त्यामुळे ज्यावेळी दीपिका ऑडीशनसाठी पोहचल्या त्यावेळी जवळपास आधीच २५ मुली ऑडीशनसाठी आल्या होत्या.  

 

रामानंद यांच्या प्रत्येक कसोटीवर दीपिका ख-या उतरल्या आणि २५ मुलींमधून सीता म्हणून दीपिका यांना सिलेक्ट करण्यात आले. रामानंद यांच्या कल्पनेतील सीता जेव्हा टीव्हीवर झळकली तेव्हा साक्षात रामायणातील सीतेला रसिकांना देवीप्रमाणे पुजले आणि जिथे जिथे राम आणि सीता जायचे तिथे त्याच्या पायाल स्पर्श करून आशिर्वाद घेतला जायचा.

 

टॅग्स :रामायण