कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. सर्वसामान्य असो किंवा मग सेलिब्रिटी, सगळेच आपला छंद आणि आवड जोपासताना पाहायला मिळतात.
असाच काहीसा छंद विराजस कुलकर्णीलाही असल्याचे समोर आले आहे.'माझा होशील ना मालिकेत' विराजस कुलकर्णीने आदित्य ही भूमिका साकारली होती. या मालिकेतून तो घराघरात पोहचला होता. त्याच्या भूमिकेला प्रचंड पसंती मिळाली होती. मालिका बंद झाली असली तरी आदित्य सकाराणाऱ्या विराजसला रसिक प्रचंड मिस करतात. सोशल मीडियावरही चाहते त्याला प्रचंड फॉलो करतात. दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. मालिका संपल्यानंतर विराजस आता काय करतोय ? सध्या कुठे बिझी आहे ? सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांना समजतील. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओच्या माध्यमातून त्याची आणखी एक कला जगासमोर आली आहे.
बोलक्या बाहुल्यासोबत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. कार्टून्स, एनिमेशनच्या जमान्यात आजही बोलक्या बाहुल्या अर्थात पपेट्सची लोकप्रियता कमी झालेली नाही. हेच विराजसच्या या व्हिडीओवरुन स्पष्ट होते.हा व्हिडीओ पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड कौतुक करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने 'हॉस्टेल डेज' या चित्रपटात काम केले होते. विराजस आणि शिवानी रांगोळे यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. विराजस आणि शिवानीची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. शिवानीने विराजसच्या 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात काम केलं होत. तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली होती.