बिग बॉस ओटीटी २ (Bigg Boss OTT 2) हा शो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्यातील वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत येत आहे. या घरात स्पर्धकांमध्ये घडत असलेल्या विचित्र प्रकारामुळे अनेकांनी या कार्यक्रमाला ट्रोल केलं आहे. यात अलिकडेच प्रकृतीचं कारण देत सायरस ब्रोचा (cyrus brocha) हा घरातून बाहेर पडला. अलिकडेच झालेल्या विकेंड का वॉरमध्ये त्याने सलमानला विनंती करुन या घरातून बाहेर पडू द्या असं सांगितलं. परंतु, बिग बॉसचं कॉन्ट्रॅक्ट (contract) तोडल्यानंतर स्पर्धकाला त्याची मोठी आर्थिक परतफेड करावी लागते. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट तुटल्यानंतर स्पर्धकाला कशा स्वरुपाचा दंड भरावा लागतो ते पाहुयात.
अलिकडेच सायरसने डायबिटीस बॉर्डर लाइनवर आल्याचं सांगत या शोमधून बाहेर पडण्याची विनंती केली. त्याच्या या रिक्वेस्टनंतर सलमानने त्याला करार मोडून दंड भरुन बाहेर जायचं आहे का? असा प्रश्न विचारला. सलमानच्या या प्रश्नावर सायरस थोडा वेळा थांबला. तेव्हापासून बिग बॉसचा करार काय आहे आणि तो मोडल्यावर दंड कशा स्वरुपाचा असो ही चर्चा सगळीकडे रंगली आहे.
काय आहे बिग बॉसचं कॉन्ट्रॅक्ट?
बिग बॉसचं १२५ पानांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक नियम व अटी असतात. ज्या स्पर्धकांना बंधन कारण असतात. या करारानुसार, स्पर्धकांना प्रोडक्शन आणि चॅनेलने दिलेल्या मर्यादित वेळेपर्यंत या शोमध्ये रहावं लागतं. तसंच स्पर्धक स्वत:च्या इच्छेनुसार घराबाहेर जाऊ शकत नाही. तसंच स्पर्धकाला या घराबाहेर जायचं असेल तर त्यांना २ कोटी रुपयांचानदंड भरावा लागतो. तसंच कॉन्ट्रॅक्ट तोडल्याचा परिणाम स्पर्धकाच्या मानधनावरही होतो. दरम्यान, सायरसपूर्वी अनेक स्पर्धकांनी हा शो सोडायचा प्रयत्न केला. मात्र, करारामुळे त्यांना पुन्हा या शोमध्ये यावं लागलं.