जाणून घ्या त्या दिवशी विमानात काय घडले? तुम्हाला माहीत आहे का कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला चप्पलने चोपले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 7:48 AM
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातील सगळी मंडळी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिडनीला गेले ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातील सगळी मंडळी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिडनीला गेले होते. तिथून परतत असताना विमानात कपिल शर्माने नशेच्या धुंदीत सुनील ग्रोव्हरसोबत भांडण केले. एवढेच नव्हे तर कपिलने त्याच्यावर हात उगारला आणि तू माझा नोकर आहेस असे त्याला बोलला. त्यावेळी या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी मध्यस्थी करून कपिलला शांत केले असे म्हटले जात होते. पण कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाला आता नवे वळण मिळाले आहे. कपिलने दारुच्या नशेत सुनिलला केवळ शिक्याच दिल्या नाहीत तर त्याला बूट फेकून मारला असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. त्या विमानातील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तपत्राला याविषयी माहिती दिली आहे. त्या कर्मचाऱ्याने सांगितले आहे की, कपिलने संपूर्ण बॉटल विस्की प्यायली होती. विमानात जेवण दिल्यानंतर कपिलच्या टीममधील सगळे लोक जेवायला लागले. पण कपिल दारू पित असल्याने त्याने जेवायला सुरुवात केली नव्हती. त्यावर मी जेवलो नसताना तुम्ही कसे जेऊ शकता असे म्हणत त्याने भांडण करायला सुरुवात केली. कपिल प्रचंड दारुच्या नशेत होता. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या टीममधील लोकांनी त्यांची जेवणं लगेचच विमानातील कर्मचाऱ्यांना परत केली आणि सुनीलने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण कपिल त्याच्यावरच ओरडायला लागला आणि त्याने त्याची चप्पल काढली आणि सुनीलला मारायला सुरुवात केली. तसेच सुनीलची कॉलर पकडून तो त्याला सतत मारत होता. या सगळ्यात कपिलच्या टीममधील एका महिला कलाकारालादेखील मार लागला. एवढे होऊनही कपिलला शांत होण्यासाठी सुनील सांगत होता. कपिलच्या आवाजामुळे विमानातील लोकदेखील घाबरले होते. त्यावर कपिलला शांत करण्यासाठी विमानाच्या कर्मचाऱ्यांनी कपिलच्या टीममधील मंडळींना सांगितले. पण कपिलचा हा अवतार पाहून टीममधील सगळेच खूप घाबरले होते. कपिल त्याच्या टीममधील लोकांना म्हणत होता की, तुमचे करियर मी बनवले आहे, मी सगळ्यांचे करियर जसे बनवले आहे तसे ते बरबाददेखील करू शकतो. तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रमातून मी काढून टाकेन. तसेच तो सुनीलला बोलला, तू गेला होतास. पण तुला परत माझ्याकडेच यावे लागले ना... (काही वर्षांपूर्वी कपिलशी वाद झाल्यानंतर सुनील ग्रोव्हरने कॉमेडी नाइटस विथ कपिल हा कार्यक्रम सोडला होता आणि मॅड इन इंडिया या कार्यक्रमाचा तो भाग झाला होता. पण हा कार्यक्रम फ्लॉप झाल्याने त्याला कपिलच्या कार्यक्रमात परतावे लागले) तसेच द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात केवळ मी एकटा पुरुष आहे, तुम्ही तर बायकांच्या वेशात वावरता असेही तो कार्यक्रमाच्या टीमला बोलला. ही गोष्ट त्याने सुनील, अली असगर, किकू शारदा यांना उद्देशून म्हटली होती. कारण हे तिघेही या कार्यक्रमाच स्त्रियांचे रूप धारण करतात.या सगळ्या प्रकारामुळे विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले होते. त्यांनी इर्मजन्सी लँडिग करता येईल का असेदेखील विमानाच्या कर्मचाऱ्यांना विचारले होते. कपिल इतका जोराने बोलता होता की बिझनेस क्लासमधून इकॉनॉमी क्लासमध्ये त्याचा आवाज जात होता. तो सगळ्या टीमला पंजाबीत मोठमोठ्याने शिव्या देत होता. शेवटी कपिल गप्प न बसल्यास लँडिग झाल्यावर सिक्युरिटीला बोलावण्यात येईल असे विमानच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले. पण तरीही तो शांत व्हायला तयार नव्हता. आणखी वाचा ः सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतच्या भांडणाचा केला लोकमतकडे खुलासाआणखी वाचा ः केवळ सुनील ग्रोव्हरच नव्हे अली असगर आणि चंदन प्रभाकरदेखील सोडणार द कपिल शर्मा शो?