Join us  

'बिग बॉस'मध्ये जायला कोकण हार्टेड गर्लने दिलेला नकार, अंकिता म्हणालेली- "तिथे जाऊन भांडण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:53 AM

सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा असून कोकण हार्टेड गर्ल नावाने ओळखली जाणाऱ्या अंकिता वालावलकरने एकदा बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला होता (bigg boss marathi 5, ankita walawalkar)

सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये अनेक सोशल मीडिया स्टार सहभागी आहेत. त्यापैकी घरात आणि घराबाहेर जास्त चर्चा आहे ती म्हणजे अंकिता प्रभू वालावलकरची. 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने अंकिताला ओळखलं जातं. अंकिता सध्या बिग बॉसमध्ये खेळ चांगला खेळतेय. इतकंच नव्हे तर ती घराची पहिली कॅप्टनही झालीय. पण अंकिताने एकदा जुन्या मुलाखतीत बिग बॉसमध्ये जायला नकार दिला होता. काय होतं त्यामागचं कारण?

अंकिता वालावलकर बिग बॉसमध्ये जायला नाही का म्हणालेली?

अंकिता प्रभू वालावलकरने एका न्यूज चॅनलला एक वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती. त्यात तिने बिग बॉसच्या घरात जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर त्यामागचं कारणही सांगितलं होतं. अंकिता म्हणाली होती, "मी बिग बॉसमध्ये नाही जाणार. कारण मी भांडत बसेन तिथे जाऊन. मला पटत नाहीत कोणाच्या गोष्टी, त्यामुळे मी नाही जाणार तिथे" असं अंकिता म्हणाली होती. 

बिग बॉसचा खेळ अंकिता गाजवतेय

अंकिताने कोणे एके काळी बिग बॉस मराठीमध्ये जायला नकार दिला असला तरी सध्या मात्र ती बिग बॉस मराठीचा नवीन सीझन गाजवताना दिसतेय. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं पहिलं कॅप्टनसी कार्य काही दिवसांपूर्वी पार पडलं. यात अंकिताने जबरदस्त खेळ दाखवला. याशिवाय घरातील पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे अंंकिताचा ग्रुप आणि तिचे चाहते नक्कीच आनंदी झाले असतील यात शंका नाही.

टॅग्स :बिग बॉस मराठीअंकिता प्रभू वालावलकररितेश देशमुखकलर्स मराठी