Join us  

सगळं सोडून Bigg Boss Marathi पाहत बसल्या, क्रांती रेडकर अन् सायली संजीवचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 12:01 PM

प्रेक्षकच नाही तर कलाकारांमध्येही बिग बॉसची चर्चा होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी सीझन ५ सुरु होऊन एक महिना उलटला आहे. या सीझनची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. तसंच रितेश देशमुखचा भाऊचा धक्काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. टीआरपीमध्ये रितेशच नंबर वनला आहे.  प्रेक्षकच नाही तर कलाकारांमध्येही बिग बॉसची चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच क्रांती रेडकरने एका हॉटेलमध्ये बसून बिग बॉस पाहतानाचा व्हिडिओ शेअर केला.

क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) या दोन्ही मराठमोळ्या सेलिब्रिटी दहीहंडी कार्यक्रमासाठी नागपूरला एकत्र होत्या. नंतर दोघी एका हॉटेलमध्ये बसल्या असता समोर त्यांनी मोबाईलवर बिग बॉस लावलेलं दिसत आहे. शनिवारचा भाऊचा धक्का सुरु आहे. क्रांतीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. टेबलवर मोबाईलवर भाऊचा धक्का सुरु दिसतोय आणि दोघी जणी ते पाहण्यात मग्न आहेत. क्रांती म्हणते, "सगळं सोडून आम्ही बिग बॉस पाहतोय. मोबाईलवर लाईव्ह बघतोय. आमची टीम C आहे. बाईsss हा काय प्रकार."

दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर दोघीही मराठमोळ्या लूकमध्येच हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेत आहेत. सायली निळ्या साडीत तर क्रांती जांभळ्या साडीत अगदी सुंदर दिसत आहे. क्रांती आणि सायलीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही मजा घेतली आहे. 'किती मन लावून पाहताय दोघी','बाईss हा काय प्रकार...मॅडम तुम्ही पण' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. 

टॅग्स :क्रांती रेडकरसायली संजीवबिग बॉस मराठीसोशल मीडिया