Join us

कृष्णा चली लंडनमध्ये सुष्मिता मुखर्जी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 7:58 AM

‘स्टार प्लस’ वाहिनी लवकरच ‘कृष्णा चली लंडन’ ही एक नवी मालिका प्रसारण करणार असून त्यात राधे या मुलाची प्रेमकथा ...

‘स्टार प्लस’ वाहिनी लवकरच ‘कृष्णा चली लंडन’ ही एक नवी मालिका प्रसारण करणार असून त्यात राधे या मुलाची प्रेमकथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेतील एका भूमिकेसाठी हिंदी चित्रपटांतील प्रसिध्द अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी हिची निर्मात्यांनी निवड केली आहे. आपल्या स्त्रीकेंद्रित भूमिकांसाठी ही लोकप्रिय बंगाली अभिनेत्री प्रसिध्द आहे.यासंदर्भात सुष्मिता मुखर्जीने सांगितले,“मी या मालिकेत एका अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत आहे.या मालिकेची कथा आणि पटकथा इतकी उत्तम आहे की ती प्रेक्षकांशी तात्काळ भावनिक नातं जोडेल.तसंच तरुण,नव्या कलाकारांबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे.”राधे हा कानपूरमध्ये राहणारा 21 वर्षांचा देखणा तरुण असतो. त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते- ते म्हणजे लग्न करणे! तसा तो स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असतो आणि त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा असते.या मालिकेपूर्वी सुष्मिता 'दिल बोले ओबेरॉय' या मालिकेतही पहायला मिळाली होती.या मालिकेत नकारात्मक भूमिका तिने साकारली होती.कृष्णा चली लंडन या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये राधे आपली स्वत:ची माहिती देत असून त्याचा मित्र साजन ती मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राधेची ओळख जाणून घेण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारले जात आहेत. यात त्याचे ‘नाव’, ‘काम’, ‘आपल्या पायावर उभा आहे की नाही?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्याला देताना दिसत आहे. या प्रोमोच्या अखेरीस राधे आपली ही ओळख करून देणारा व्हिडिओ अनेक मुलींना पाठवतो आणि त्यासोबत एक प्रश्नही विचारतो, “है कोई नजर में?”कृष्णा चली लंडन या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले असले तरी या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.येत्या उन्हाळ्याच्या सुटीत प्रेक्षकांना आपल्या भावी अर्धांगिनीचा शोध घेणारऱ्या राधेची निरागसता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडेल. अशा या स्वप्नाळू राधेच्या प्रेमात प्रेक्षक देखील पडतील अशी कृष्णा चली लंडन या मालिकेच्या टीमला खात्री आहे.