Join us

वन नाईट स्टँड पासून सुरु झाली कपलची लव्हस्टोरी; शाहरुख, जॅकीसोबत दिसलीये 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:26 IST

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने १० वर्ष लहान अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ

शाहरुख खान ते जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीची लव्हस्टोरी माहितीये का? बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करणाऱ्या या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत होतं. घटस्फोट आणि नंतर १० वर्ष छोट्या अभिनेत्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. दोघांचं नातं टिकेल यावर कोणाचाच विश्वास नव्हता पण त्यांच्या लग्नाला आता १८ वर्ष झाली आहेत. नक्की कोण आहे हे कपल?

ही अभिनेत्री आहे कश्मीरा शाह (Kashmera Shah) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek). कृष्णाने नुकतंच करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "कश्मीरा शाहरुख आणि जॅकी श्रॉफ सारख्या टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम करणारी एक हॉट, सेक्सी आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. मी तेव्हा इंडस्ट्रीत नवीन होतो. माझ्यासाठी वयातील अंतर हे महत्वाचं नाही. मी तिला भेटलो, मला ती आवडली आणि आमची व्हाईब मॅच झाली हेच पुरेसं आहे."

तो पुढे म्हणाला, "कश्मीरा माझी गर्लफ्रेंड आहे हे सांगताना मला मजा यायची. मी लोकांना सांगायचो मी कश्मीराला डेट करतोय. जयपूरमधील फिल्म सेटवर आमची ओळख झाली. हळूहळू आमची मैत्री झाली आणि एक दिवस, एक दिवस कश्मीराने मला घरी डिनरसाठी बोलवलं. त्या दिवशी आमचं नातं सुरु झालं. (हसत) वन नाइट स्टँडसोबत."

कृष्णा आणि कश्मीरा सध्या 'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहेत. २०१३ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना रायन आणि क्रिश्नाग हे जुळे झाले. 

टॅग्स :कृष्णा अभिषेकटिव्ही कलाकारपरिवारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट