Join us

पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये Kapil sharma ने Archana Puran Singhला US टूरमधून दाखवला बाहेरचा रस्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:24 IST

कपिल शर्मा जून-जुलैमध्ये यूएस टूरसाठी रवाना होणार आहे, पण या टूरचा भाग अर्चना पुरनसिंग नाहीय.

अर्चना पूरण सिंह अनेकदा 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंहची टिंगल करताना दिसत आहे कारण कपिल शर्माने तिच्या यूएस टूरसाठी तिची निवड केलेली नाही.

खरंतर कपिल शर्मा जून-जुलैमध्ये यूएस टूरसाठी रवाना होणार आहे, ज्यामध्ये कृष्णा अभिषेक देखील एक भाग आहे. कृष्णा कपिलच्या शोमध्ये सपना पार्लर वालीची भूमिका साकारत आहे आणि जॅकी श्रॉफपासून ते धर्मेंद्रपर्यंत मिमिक्री करताना दिसतो.अर्चना पूरण सिंह 'द कपिल शर्मा शो'ची जज आहे. अर्चनाने नुकताच कृष्णा अभिषेकसोबत एक मजेदार व्हिडिओ बनवला आहे.

व्हिडिओमध्ये अर्चना कृष्णा अभिषेकला विचारते आहे की तो आज कोणती नवीन गोष्ट करणार आहे. याला उत्तर देताना कृष्णा म्हणतो, 'आम्ही मसाज करू. मी एक कोटी मागणार आहे. हे ऐकून अर्चना पूरण सिंह  मिळणार नाही असे सांगते तेव्हा कृष्णाने तिला कपिलचे नाव घेऊन चिडवायला सुरुवात केली.

कृष्णा अभिषेक म्हणतो की कपिल शर्मा अर्चना पुराणला त्याच्या बाकीच्या शो टीमसोबत टूरवर घेऊन जात नाहीये. हे ऐकून अर्चना म्हणते, 'तुम्ही लोक. पैसे वाचवण्याच्या नादात. मला घेऊन जात नाही आणि मला बदनाम केलं आहे.'

कॉमेडियन कपिल शर्माने नुकतीच यूएस-कॅनडा टूर 2022 ची घोषणा केली. ही इंटरनॅशनल टूर 11 जूनपासून सुरू होणार आहे. 11 जूनपासून न्यू जर्सीमध्ये सुरू होणारी ही टूर लॉस एंजेलिसमध्ये संपेल. कपिलचा हा दौरा ३ जुलैपर्यंत चालणार आहे. कपिल शर्माने या इंटरनॅशनल टूरची घोषणा करताना आनंद व्यक्त केला. कपिलचे विदेशातील चाहतेही या दौऱ्यात कपिलला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :कपिल शर्मा अर्चना पूरण सिंग