Join us

कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी खास बनवली जात आहेत गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 5:19 AM

‘स्टार प्लस’वर ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात ...

‘स्टार प्लस’वर ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते.कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना आपल्याला दिसणार आहे. या मालिकेच्या संकल्पनेविषयी निर्मात्या गुल खान सांगतात, “कुल्फी ही एक अशी मुलगी आहे की, तिच्यासाठी तुम्ही आपल्या साऱ्या चिंता आणि काळजी विसरून जाल आणि तिच्यासोबत तिच्या संगीतमय प्रवासाचे साथीदार व्हाल. तिच्या नावाप्रमाणेच आमची ही चिमुरडी अगदी गोड आहे. ही एका मुलीची आणि तिच्या संगीताची कथा आहे. या मुलीत कोणत्याही आवाजातील नाद (किंवा लय) अचूक पकडण्याची शक्ती आहे. टीव्हीवरील काल्पनिक मनोरंजन मालिकांमध्ये अशी संगीतमय मालिका यापूर्वी कधी सादर झालेली नाही. संगीताच्या माध्यमातून एका लहान मुलीच्या भावना व्यक्त करणारी ही हृदयस्पर्शी कथा आहे.”कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत सात वर्षांच्या कुल्फीची व्यक्तिरेखा आकृती शर्मा साकारणार आहे. या मालिकेत मोहित मलिक, अंजली आनंद, पल्लवी राव,  मेहुल बुच आणि श्रृती शर्मा असे अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेसाठी काही गाण्यांची खास निर्मिती करण्यात आली आहेत. या मालिकेत इक्बाल खान देखील मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेची निर्माती गुल खान आणि इक्बाल हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे गुलने कुल्फीकुमार बाजावाला या मालिकेबाबत विचारले असता त्याने या मालिकेत काम करण्यास लगेचच होकार दिला. तसेच या मालिकेत अपरा मेहता नायकाच्या आईची भूमिका साकारणार आहे. एक तरूण मुलगी आपल्या कुटुंबाला परिपूर्ण बनवण्यासाठी आपल्या बेपत्ता वडिलांचा शोध घेते, अशी या मालिकेची संकल्पना आहे. ही एक नकारात्मक भूमिका असून अपराची भूमिका प्रेक्षकांना प्रंचड आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे