कोकण हार्टेड गर्ल नावाने लोकप्रिय असलेली सोशल मीडिया इन्फ्लयुन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) हिने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) १६ फेब्रुवारी रोजी लग्न केले. कोकणात मालवणमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. आता लग्नानंतर ते दोघे पहिल्यांदा गुढीपाडवा सण साजरा करणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्या दोघांची त्यांची पहिली भेट, लग्नानंतरचे आयुष्य अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता आणि कुणालने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. कुणाल भगत म्हणाला की, खरी सुरूवात ही इंस्टाग्रामवरुन झाली. मी खूप मेसेज करायचो. फ्लर्ट करायचो. त्यावेळी तिने मला खूप इग्नोर केलं होतं. मग हळूहळू आमचं इंस्टाग्रामवरुन बोलणं सुरू झालं आणि माझ्याकडून फ्लर्ट सुरू झालं. मग आमची झी मराठी पुरस्कार सोहळ्यात भेट झाली. त्यानंतर अंकिता म्हणाली की, सूर जुळले म्हणजे नक्की कोणी जुळवले ते कळलंच असेल तुम्हाला. म्युझिक डिरेक्टर असल्यामुळे सूर इथूनच जुळले गेले.
पहिली भेट...पहिल्यांदा प्रपोझ कधी केलं, यावर अंकिता म्हणाली की, आम्ही प्रॉपर पहिल्यांदा भेटलो. तेव्हा तो मला म्हणाला की, आपण एकदा भेटूयात. जरी आमची पहिली भेट पुरस्कार सोहळ्यात झाली पण तेव्हा आम्ही फक्त हाय हॅलो केलं होतं. पहिल्यांदा प्रॉपर भेटून छान बोलूयात असं ठरलं तेव्हाच त्याने मला प्रपोझ केलं. त्यानंतर कुणाल म्हणाला की, पहिल्या भेटीतच मी तिला सांगून टाकलं. लग्न नंतर करुया असं नाही म्हटलं. पण ती आवडत असल्याचे सांगितले. ही आमची ऑफिशिएल पहिली भेट होती.
खरेतर अंकिता कुणालला आधी ओळखत नव्हती. त्याच्या मेसेज कडेही दुर्लक्ष करत होती. तिला एकाने सांगितलं की, तुला अशी अशी व्यक्ती मेसेज करतेय. ते बघ. तेव्हा तिने कुणालचं प्रोफाईल पाहिलं. तिने कुणालची बरीच गाणी ऐकली आहेत. पण त्याचा म्युझिक डिरेक्टर तो आहे, हे तिला माहितच नव्हते, असे मुलाखतीत अंकिताने सांगितले.