Join us

‘इश्कबाझ’ आणि ‘दिल बोले ओबेरॉय’ मालिकेतील कुणाल जयसिंग सांगतोय बंधूंच्या प्रेमजीवनाचा नवा अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 6:50 AM

‘दिल बोले ओबेरॉय’ ही ‘इश्कबाझ’ मालिकेचीच विस्तारित आवृत्ती असलेली मालिका 13 फेब्रुवारीपासून रसिकांच्या भेटीला आली आहे. मालिकाविश्वात एकाच मालिकेचा ...

‘दिल बोले ओबेरॉय’ ही ‘इश्कबाझ’ मालिकेचीच विस्तारित आवृत्ती असलेली मालिका 13 फेब्रुवारीपासून रसिकांच्या भेटीला आली आहे. मालिकाविश्वात एकाच मालिकेचा विस्तारित भाग प्रसारित करण्यचा हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी मालिका विश्वात वेगेवगळे प्रयोग मालिका रसिकांच्या भेटील आल्या. डेली सोपच्या गर्दीत एपिसोडीक ठराविक भागाच्या मालिका मध्यंतरी रसिकांच्या भेटीला आल्या. डेली सोप पेक्षा एपिसोडीक टीव्ही सिरीजला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.त्यामुळेच डेली सोप असणा-या मालिकांकडे रसिकांनी पाठ फिरवू नये यासाठी नवीन युक्त्या लढवत नवनवे प्रयोग केल्याचे पाहयला मिळतंय. इश्कबाज मालिकेचा विस्तारित भाग दिल बोले ओबेरॉय नावाने प्रसारित करणे हा नवा प्रयोग आता मालिका विश्वासत पहिल्यांदाच केला जातोय. याच निमित्ताने या मालिकेतील कुणाल जयसिंगशी या दोन्ही मालिकांविषयी नेमके त्याचे मत काय आहे हे जाणून घेतलंय. ‘इश्कबाझ’ आणि ‘दिल बोले ओबेरॉय’ यांच्यात काय फरक आहे?सध्या भारतीय मालिकाविश्वात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. विशेष म्हणजे हे प्रयोग रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता भारतीय मालिका विश्वात आणखी एक नवा प्रयोग केला जाणार आहे. 'इश्कबाज' मालिकेतील विस्तारित भाग ‘दिल बोले ओबेरॉय’नावाने प्रसारित केले जाणार आहे.यापूर्वी मालिका विश्वात कधीही अशाप्रकराचा प्रयोग झालेला नाही. त्यामुळे आम्ही सगळेच या खूप उत्सुक आहोत. प्रेक्षकांनी आतापर्यंत आमच्यावर भरपूर प्रेम केलं असून त्यांना ओबेरॉय बंधूंबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं. पण वेळेच्या अभावी प्रत्येक ओबेरॉय भावाला ‘इश्कबाझ’मध्ये फारच थोडा वेळ देता येत होता. आता ज्यांना ‘इश्कबाझ’मध्ये वेळ देता येत नव्हता, त्यांची कथा ‘दिल बोले ओबेरॉय’मध्ये तपशिलाने प्रसारित केली जाईल.इश्कबाझ’ ही तीन ओबेरॉय बंधूंची कथा होती. शिवाय, ओंकारा आणि रुद्र या प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व आणि जीवनशैली भिन्न होती; परंतु ते एकमेकांशी बंधूप्रेमाच्या मजबूत धाग्याने बांधले गेले होते. आता या बंधूंना आपापले जीवनसाथी लाभले असून त्यांच्याबरोबर त्यांचे प्रेमजीवन कसे असेल, त्याची कथा ‘दिल बोले ओबेरॉय’मध्ये सादर केली जाणार आहे. या प्रत्येकापुढे काही ना काही समस्या आणि अडचणी येतील आणि त्याची स्वतंत्र कथा असेल. ‘इश्कबाझ’मध्ये शिवाय आणि अन्निकाच्या कथेवर भर दिला जात असून ‘दिल बोले ओबेरॉय’मध्ये ओंकाराच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला जात आहे.‘इश्कबाझ’चीच एक विस्तारित आवृत्ती नव्या मालिकेच्या रूपाने सादर करण्याची कल्पना कशी सुचली?हिंदीभाषिक सर्वसामान्य मनोरंजन वाहिन्यांचा मुखडाच पालटून टाकण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजेच ‘दिल बोले ओबेरॉय’ ही मालिका आहे. भारतीय टीव्हीवर प्रथमच एका चालू मालिकेचीच दुसरी (विस्तारित आवृत्ती) मालिका एकाच वेळी प्रसारित होत आहे. ‘इश्कबाझ’मधली या तीन ओबेरॉय बंधूंमधील नातेसंबंधांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आता ‘दिल बोले ओबेरॉय’द्वारे या तीन बंधूंच्या प्रेमजीवनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. त्याच्या कथानकातील अनेक कलाटण्या आणि नवी वळणं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवीत राहील.ओंकाराच्या व्यक्तिमत्त्वातील जाणून घ्यायला आवडेल?ओंकारा हा या तीन बंधूंमध्ये सर्वाधिक वास्तववादी असून त्याने ओबेरॉय घराण्याशी जोडलेला वारसा स्वीकारण्यास नकार दिला आहे. परिस्थितीमुळे त्याच्या स्वभावात मूलभूत बदल घडतो. आता त्याच्या आयुष्याचं एकच ध्येय असतं : स्वत:च्या हिंमतीवर जास्तीत जास्त पैसे कमावणं. त्याने आपल्या प्रेमजीवनाचा पूर्णपणे त्याग केला आहे, प्रेमाची भावनाच त्याच्या मनातून हद्दपार झाली आहे.‘दिल बोले ओबेरॉय’मध्ये सहभागी झालेल्या नव्या कलाकारांविषयी काय सांगशील?या मालिकेत राहुल देव, सुष्मिता मुखर्जी, निधी उत्तम यासारखे बॉलीवूडमधले नावाजलेले कलाकार भूमिका साकारणार आहेत. ओंकाराची नायिका गौरीकुमारी शर्माच्या रूपात श्रेणू पारिख आहे.‘इश्कबाझ’च्या यशानंतर ‘दिल बोले ओबेरॉय’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.‘दिल बोले ओबेरॉय’च्या प्रोमोंना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. ओंकारा आणि गौरी हे अगदी अनपेक्षितपणे परस्परांच्या जीवनात प्रवेश करतात. या दोघांचा जीवनाकडे आणि प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परविरोधी आहे.अशा स्थितीत हे दोन जीव एकमेकांना भेटतील, तेव्हा काय होईल, याची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे.