‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) म्हणजे धम्माल मनोरंजन. आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारा कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. सतत नवनवीन पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच पोस्ट लक्ष वेधून घेतेय. अभिनेत्याने आपल्या पत्नीसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, युष्य सुगंधी करुन टाकणारं परफ्युम कोणत्याच बाजारात मिळत नाही, अगदी टर्मिनल २ ला सुद्धा, ते आत कुठेतरी दडलेलं असतं माणसा माणसात,मातीत कसा म्रुदगंध दडलेला असतो , पाऊस पडला की आपोआप बहरुन येतो तसच. शेवटी माणसंही मातिचीच म्हणा, सुगंधी असायचीच. फक्त पावसासारखं कोणितरी कोसळणारं हवं. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मस्त लिहतोस रे भावा, असंच लिहता लिहता एक दिवस picture लिहून टाक...,वा वा कुशल,..खूप सुंदर लिहितात तुम्ही अशी कमेंट्स चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर केल्या आहेत.