Join us  

'कुणाचं गळकं, कुणाचं कोसळणारं...', कुशल बद्रिकेच्या 'त्या' पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:48 AM

Kushal Badrike : आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मनं जिंकणारा कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असतो.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) गेल्या कित्येक वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या शोमधील विनोदवीर आपल्या विनोदशैलीनं रसिकांना खळखळून हसायला भाग पाडतात.यातील विनोदवीर भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके घराघरात पोहचले आहेत. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मनं जिंकणारा कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असतो. नवनवीन पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या कुशलची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इमारती आणि आभाळ दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, इथं प्रत्येकाच आभाळ वेगळं आहे, कुणाचं आभाळ फाटलेलं, कुणाचं गळकं, कुणाचं कोसळणारं, कुणाचं मायेनं मुसमुसणार. कुणाचं अधांतरी सावरलेलं, कुणाचं अलगत अंगावर पांघरलेलं. प्रत्येकाच आभाळ वेगळं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. (सुकून). कुशलच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. कुशलने अनेक रिअॅलिटी शोसोबतत काही लोकप्रिय चित्रपटांमध्येही काम केले आहे. शेवटचा तो झोलझाल या चित्रपटात पाहायला मिळाला. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या