Join us

मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या अभिनेत्याने केली होती आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:26 AM

या अभिनेत्याचा आज वाढदिवस असून त्याचे फॅन्स त्याला खूप मिस करत आहेत.

ठळक मुद्दे इन्स्टा स्टोरीवर कुशलने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट ठरली. तसेच त्याने त्याच्या मृत्यूच्याआधीच त्याची संपूर्ण प्रॉपर्टी त्याचे वडील, बहीण आणि मुलाच्या नावे केली होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली होती. कुशलने गळफास घेऊन राहात्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

कुशलचा आज वाढदिवस असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तसेच तो अनेक चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. हृतिक रोशन आणि प्रीती झिंटाच्या लक्ष्य या चित्रपटात तर त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. कुशलने आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट लिहिली होती आणि या सुसाईडसाठी कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये असे त्यात नमूद केले होते. 

कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड ऑड्रे डोल्हेनसोबत लग्न केले होते. पण ते काही महिन्यांपासून वेगळे राहात होते. दोघांना एक मुलगा असून कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट ठरली. तसेच त्याने त्याच्या मृत्यूच्याआधीच त्याची संपूर्ण प्रॉपर्टी त्याचे वडील, बहीण आणि मुलाच्या नावे केली होती.

कुशालने इंडस्ट्रीमध्ये एक डान्सर आणि मॉडेल म्हणून आपले पाऊल टाकले होते. त्याने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात 1995 मध्ये आलेल्या 'अ माउथ फुल ऑफ स्काय' ने केली होती. त्यानंतर तो 'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देखो मगर प्यार से', 'डॉन' यांसह अनेक मालिकांमध्ये दिसला. कुशल बॉलिवूडच्याही अनेक सिनेमांमध्येही झळकला आहे. ‘जोर का झटका- टोटल वाइपआऊट’ हा रिअ‍ॅलिटी गेम शो त्याने जिंकला होता. बक्षिसाच्या रकमेपोटी त्याला 50 लाख रूपये जिंकली होते. अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही त्याने काम केले.

कुशल सिंधी कुटुंबात जन्मला होता. लहानपणापासून त्याला सायकलिंग, स्केटिंग, स्वीमिंग, डान्सिंगची आवड होती. अ‍ॅडवेंचर्स स्पोर्ट म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच जॅज आणि हिप हॉप डान्स फॉर्ममध्ये तो एक्सपर्ट होता. ट्रॅव्हलिंग आणि आऊटडोर स्पोर्टची त्याला प्रचंड आवड होती.

टॅग्स :कुशल पंजाबी