अवघ्या 37 व्या वर्षी टीव्ही अभिनेता कुशालने त्याच्या राहत्या घरी फॅनला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला भाभा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला तिथेच मृत घोषित केले. कुशालवर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले गेले. कुशलच्या दुःखद बातमीने मनोरंजन जगतात शोककळा पसरली आहे. कुशलच्या घरी सुसाइट नोटही पोलिसांना मिळाली आहे. कुशलने आधीच त्याची संपूर्ण प्रॉपर्टी त्याचे वडील, बहिण आणि मुलाच्या नावे केली आहे. या सुसाइड नोटमध्ये या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने लिहिले आहे. कुठेही पत्नीविषयी उल्लेख नसल्यामुळे त्याचे आत्महत्येमागे पत्नी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती.
कुशलने आत्महत्येवर अनेक तर्कवितर्क लावले जात असताना त्याच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे. याची पुसटशीही कल्पना कोणालाच नव्हती. नेहमी हसत मुख असलेल्या कुशल कधीच वाटले नाही तो असे काही पाऊल उचलेल अशा प्रतिक्रीया त्याचे मित्रमंडळी देत आहेत.
कुशालने इंडस्ट्रीमध्ये एक डान्सर आणि मॉडेल म्हणून आपले पाऊल टाकले होते. त्याने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात 1995 मध्ये आलेल्या 'अ माउथ फुल ऑफ स्काय' ने केली होती. त्यानंतर तो 'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देखो मगर प्यार से', 'डॉन' यांसह अनेक सीरियल्समध्ये दिसला. कुशाल बॉलिवूडच्याही अनेक सिनेमांमध्येही झळकला आहे.