Join us

फ्लाईटमध्ये अचानक भेटली गौहर खान, एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन म्हणाला, हाय किस्मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 10:17 AM

वाचा, पुढे काय झाले?

ठळक मुद्देकुशाल व गौहर हे दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस 7च्या घरातच त्यांच्यात प्रेम बहरले होते.

बिग बॉस 7ची विनर गौहर खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. जैद दरबारसोबत तिने लग्नगाठ बांधली. पण लग्न होत नाही तोच गौहरला कामावर परतावे लागले. अगदी हनीमून मागे सोडून गौहर कामासाठी रवाना झाली. यावेळी फ्लाईटमध्ये गौहरला कोण भेटले माहितीये? तर एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन. होय, योगायोगाने दोघेही एकाच फ्लाईटमध्ये चढले. आता पुढे काय झाले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण तुम्ही समजता असे काहीही झाले नाही.

गौहरला पाहून कुशाल थोडा शॉक्ड झाला, हे खरे. मात्र त्याने लगेच पुढे येत गौहरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. शिवाय दोघांनीही एकत्र काही व्हिडीओही बनवले. यापैकी एक व्हिडीओ कुशालने त्याच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. यात कुशाल व गौहर दोघेही दिसत आहेत. 

हा निव्वळ एक सुंदर योगायोग होता. मी फ्लाईटमध्ये होतो आणि याच फ्लाईटमध्ये मला माझी एक जुनी मैत्रिण भेटली. नुकतेच तिचे लग्न झाले. कदाचित मी तिला प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा द्याव्यात, असे नियतीच्या मनात असेन. हाय मेरी किस्मत..., असे मजेशीर कॅप्शन कुशालने हा व्हिडीओ शेअर करताना दिले.

कुशाल व गौहर हे दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस 7च्या घरातच त्यांच्यात प्रेम बहरले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही काही काळ हे प्रेम कायम होते. मात्र अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. काही कारणास्तव दोघेही एकमेकांपासून दूर झालेत. पुढे दोघांनीही आपआपले मार्ग निवडत, त्यात बिझी झालेत. दोघांचा ताजा व्हिडीओ बघता,  कुशाल व गौहर जुन्या सगळ्या आठवणी विसरलेत, असे दिसतेय. आता दोघांमध्येही आहे ती केवळ चांगली मैत्री.

टॅग्स :गौहर खानबिग बॉस