Join us  

'क्योंकी सास भी कभी बहु थी' फेम अभिनेत्याचं ४८व्या वर्षी निधन, जुळ्या मुलांवरुन वडिलांचं छत्र हरपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 2:38 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा कार्डियक अरेस्टने मृत्यू, ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या लोकप्रिय मालिकेतील कलाकाराचं निधन झालं आहे. अभिनेता विकास सेठी यांनी ४८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. पण, त्यांच्या निधनाने चाहत्यांना आणि कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर सिनेविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, विकास सेठी यांचा कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी जान्हवी सेठी आणि दोन जुळी मुले आहेत. विकास सेठी यांच्या निधनाबाबत अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन मुलांवरील वडिलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

विकास सेठी यांनी २००३ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्योंकी सास भी कभी बहु थी, कसौटी जिंदगी की, कहीं तो होगा, क्यूं होता है प्यार, उतरन, ससुराल सिमर का अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. कसौटी जिंदगी की मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू