Join us

तू माझ्या आयुष्यातला..., ‘लागीर झालं जी’ फेम अज्यानं श्वेता खरातसाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 5:11 PM

Nitish Chavan special post for Shweta Rajan Kharat : एका खास व्यक्तिसाठी, खास दिवसाचं निमित्त साधत नितीश चव्हाणने एक पोस्ट शेअर केली आहे. नितीशच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण? तर अभिनेत्री श्वेता राजन खरात.

‘लागीर झालं जी’मधील (Lagir Zal Ji ) अज्याला तुम्ही इतक्या लवकर विसरला नसाल, हे नक्की. होय, आम्ही बोलतोय ते अज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) याच्याबद्दल. तूर्तास चर्चा आहे ती नितीशच्या एका पोस्टची. होय, एका खास व्यक्तिसाठी, खास दिवसाचं निमित्त साधत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.नितीशच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण? तर अभिनेत्री श्वेता राजन खरात (Shweta Kharat ). होय, नितीशने श्वेताच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत फारच सुंदर पोस्ट देखील लिहिली आहे.

 तो लिहितो,श्वेता... द फाईटर... तुझा आज वाढदिवस,खास दिवस,जन्मदिवस आज या निमित्ताने तुला सांगावस वाटतंय की तुला फाईटर यासाठी म्हंटलो कारण इतकी वर्ष मी तुला बघत आलोय,आपण एकत्र करिअर ची सुरुवात केली या प्रवासात किती चढ उतार आले,किती अवघड परिस्थिती आली पण त्यावर तू मात केलीस आणि आज तू जे काही आहेस ते फक्त आणि फक्त तू घेतल्याला मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे.तुझ्या बरोबर राहून तुझ्याकडून खूप काही शिकलो. तुझ्ज्यात ती पॉझिटीव्ह एनर्जी आहे, तुझ्यात तो गोडवा आहे, तुझ्यात ती परिस्थितीवर मात करण्याची ताकद आहे. तू कधीच गिव्ह अप करत नाहीस. तू जिथे गेलीयेस तिथे तू तुझी छाप पाडलेली आहेस. तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस. तू कायम खुष रहा??, निरोगी रहा, आंनदी रहा आणि मुख्य म्हणजे कायम हसत रहा कारण तू जिथे असतेस तिथंल वातावरण आपोआप हसत खेळत राहतं हे माहितेय मला आणि अजून एक कारण हसत रहा कारण हसल्यावर तुझी डिंपल दिसते .स्वामींच्या आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने तुझी अशीच उत्तरोउत्तर प्रगती होत जातो, तुला उदंड आयुष्य देवो''. आता माझ्या style मध्ये Many many वाढदिवसाच्या hardik मुबारकं...Luv uuuu god bless uu Enjoy your day , असं नितीशने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

नितीश आणि श्वेता सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. दोघे सतत एकमेकांसोबत डान्स व्हिडीओ बनवत असतात. त्यांच्या डान्सचे रोमँटिक व्हिडीओ पाहून, हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. परंतु या दोघांनी कधीच याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीय. हे दोघेही आपण चांगले मित्र असल्याचं सांगतात.

टॅग्स :नितीश चव्हाण