Join us

'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:34 IST

'लागिर झालं जी'नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे 'लागिर झालं जी'. झी मराठीवरील ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील अज्या आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना भावली होती. मात्र त्याबरोबरच मालिकेतील जयडीनेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. सुरुवातीला जयडी ही भूमिका अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती. मात्र काही कारणांमुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली होती. 

'लागिर झालं जी'नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील मालिकेच्या 'उदे गं अंबे उदे' या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये यल्लमा देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'लागिर झालं जी'मधली जयडी आहे. किरण ढाणे 'उदे गं अंबे उदे' मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

जयडीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या किरणचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 'लागिर झालं जी'नंतर तिने 'एक होती राजकन्या' मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. 'पळशीची पिटी', 'डिअर लव्ह' या सिनेमांतही ती झळकली होती. 

टॅग्स :लागिरं झालं जीटिव्ही कलाकारस्टार प्रवाह