''लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी'' असे म्हणत शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकथेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. अज्या आणि शीतलीच्या प्रेमकथेवर आधारित असलेली ‘लागिरं झालं जी’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
शिवानी बावकर आणि नितेश चव्हाण यांच्या जोडीने दीड वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्त्व आहे. अजिंक्यचा मित्र राहुल्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी, भैय्यासाहेब, निलम काकी या भूमिका रसिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे ही मालिका निरोप घेणार हे कळल्यापासून या मालिकेच्या फॅन्सना नक्कीच वाईट वाटत आहे.
लागिरं झालं जी या मालिकेतील निलम काकी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत ही भूमिका मंजुषा खेतरी ही अभिनेत्री साकारत असून ती इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या खऱ्या आयुष्यातील अनेक फोटो तिथे पोस्ट करत असते. या मालिकेत ती आपल्याला नेहमीच साडीत दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती वेस्टर्न कपडे देखील घालते. तिला या कपड्यांमध्ये तुम्ही पाहिले तर तिला ओळखणे देखील तुम्हाला कठीण जाईल.
लागिरं झालं जी ही मालिका आता संपणार असून अजिंक्य आणि शीतल यांना मुलगा झाल्याचे नुकतेच मालिकेत दाखवण्यात आले आहे. आता ती लहान मूल सांभाळत आर्मीचे ट्रेनिंग पूर्ण करणार आहे. शितल आर्मीत जॉईन झाल्यावर अजिंक्य पाकिस्तानात कैदी असल्याचे सगळ्यांना कळणार आहे. त्याला भारत सरकार परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून काही महिन्यांनी तो परत येणार आहे आणि शीतल वर्दीत त्याचे स्वागत करणार आहे, असा या मालिकेचा शेवट असणार असल्याचे वृत्त आयबीएन लोकमतने काही दिवसांपूर्वी दिले आहे.