Join us

Shivani Baokar: 'लागीर झालं जी' फेम शीतलीचा डॅशिंग अंदाज; म्हणाली-लवंगी मिरचीच्या वाकड्यात गेलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 4:15 PM

'लागिरं झालं जी' (lagir zal ji) फेम शितली आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.

'लागिरं झालं जी' (lagir zal ji) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर (shivani baokar). या मालिकेत शितल पवार ही भूमिका साकारुन शिवानीने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असते. लवकरच तिची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर तिनं आपल्या नव्या मालिकाचा प्रोमो शेअर केला आहे.

नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करताना शिवानीने लिहिले, ''लवंगी मिरचीच्या वाकड्यात गेलं तर झटका लागल्याशिवाय राहणार नाही....'' शिवानीच्या नव्या मालिकेचे नाव “लवंगी मिरची” आहे. यात ती एका एका डॅशिंग मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे जी अन्याया विरुद्ध आवाज उठवतेय, आपल्या आईला हक्क मिळवून देण्यासाठी लढतेय. या मालिकेची निर्मिती केलेय रुची फिल्म्स (संगीत कुलकर्णी). संगीत कुलकर्णी यांच्या अस्मिता आणि शुभंकरोती या मालिका झी मराठीवर गाजल्या आहेत. १३ फेब्रुवारीपासून ही मालिका झी मराठीवर  दुपारी १ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

दरम्यान, 'लागिरं झालं जी' या मालिकेच्या यशानंतर शिवानी कुसुम या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत शिवानीचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना दिसली होती. नेटकऱ्यांना तिची कुसुम मालिकेतील भूमिका आवडली होती.   

टॅग्स :शिवानी बावकरझी मराठी