Join us

'लग्नाची बेडी' फेम संकेत पाठकला लागली अभिनेत्री सुपर्णाच्या नावाची हळद, अभिनेता आज चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:41 PM

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकेत आणि सुपर्णा विवाहबद्ध होत आहेत. पुण्यात या दोघांचेही मोठ्या थाटात लग्न पार पडणार आहे.

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात सध्या लग्नाचे वारे पाहताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावरील आणखी एक कपल लग्नबेडीत अडकणार आहे.  लग्नाची बेडी मालिका फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक (Sanket Pathak) आज बोहल्यावर चढणार आहे. त्याआधी त्याचे संगीत सेरेमनी आणि हळदीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक आज अभिनेत्री सुपर्णा श्याम सोबत लग्नगाठ बांधणार आहे. आता त्यांच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम, म्हणजेच हळदी आणि संगीतचे धमाल फोटो समोर आले आहेत. हळदीच्या फोटोमध्ये संकेत आणि सुपर्णा फुल्ल धम्माल करताना दिसत आहेत. संकेत आणि सुपर्णा हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. तसेच दोघांनी स्वतःच्या संगीत कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स सादर केलेला दिसत आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकेत आणि सुपर्णा विवाहबद्ध होत आहेत. पुण्यात या दोघांचेही मोठ्या थाटात लग्न पार पडणार आहे. या लग्नाला जवळच्या मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना त्यांनी आमंत्रण दिले आहे. तसेच सहकलाकार मंडळी सुद्धा या लग्नाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या लग्नाची धामधूम पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक दिसणार आहेत.

संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम (Suparna Shyam) हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर कार्यरत आहेत. दुहेरी या मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. मालिकेनिमित्त एकत्रित काम केल्यानंतर या दोघांमध्ये प्रेम जुळून आले. 

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्न