Join us

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:07 IST

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अशातच मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

'लाखात एक आमचा दादा' या छोट्या पडद्यावरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्याही शर्यतीत असते. या मालिकेतील सूर्यादादा आणि तुळजा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत तुळजाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अशातच मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

सूर्यादादाचं तुळजावर असलेलं प्रेम लपून राहिलेलं नाही. पण, तुळजाचं मात्र तिचा डॉक्टर मित्र सिद्धार्थवर प्रेम आहे. त्यामुळे सूर्यादादाचा हार्टब्रेक होतं. पण, तरीदेखील सूर्यादादा तुळजाला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी, सिद्धार्थला आणि तिला एकत्र आणण्यासाठी तुळजाला मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्या तुळजाला भर मांडवातून पळवून घेऊन जातं. पण, तुळजाला पळवून नेणं त्याला महागात पडणार आहे. त्याला डॅडींच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. 

'लाखात एक आमचा दादा' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सूर्यादादा तुळजाला पळवून नेतो. तर दुसरीकडे सत्यजीत मात्र मांडवात तुळजा सूर्याबरोबर पळून गेली म्हणत गोंधळ घालतो. सूर्याला तुळजा मंडपात पुन्हा घेऊन येत असल्याचं दिसत आहे. सूर्याला पाहून डॅडींचा राग अनावर होतो. "आमची इज्जत आमच्यासाठी सगळ्यात मोठी", असं म्हणत डॅडी सूर्याला मारहाण करतात. आणि त्याचं तुळजाबरोबर लग्न लावून देत असल्याचं दिसत आहे. 

मालिकेत अखेर सूर्यादादा आणि तुळजाचं लग्न होणार आहे. पण, तुळजा सूर्याचा नवरा म्हणून स्वीकार करेल का? आता मालिका आणखी कोणतं नवं वळण घेणार? हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकारनितीश चव्हाणमराठी अभिनेता