Join us

'लाखात एक आमचा दादा' माझी पहिलीच मालिका, त्यामुळे...; अभिनेत्री इशा संजयनं सांगितला काम करण्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 4:33 PM

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) मधली इशा संजय (Isha Sanjay) म्हणजेच सूर्यादादाची लाडकी बहीण राजश्री जिला सगळे प्रेमाने राजू म्हणतात. इशाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना खूप काही किस्से ऐकवले. नुकतेच ईशाने या मालिकेतील भूमिका आणि अनुभवाबद्दल सांगितले.

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) मधली इशा संजय (Isha Sanjay) म्हणजेच सूर्यादादाची लाडकी बहीण राजश्री जिला सगळे प्रेमाने राजू म्हणतात. इशाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना खूप काही किस्से ऐकवले. नुकतेच ईशाने या मालिकेतील भूमिका आणि अनुभवाबद्दल सांगितले.

ईशा म्हणाली की, "राजू दहावी नापास आहे पण तिचं गणित चोख आहे, घरातले व्यवहार तीच बघते. सूर्यादादा घरात नसतो तेव्हा तिचा घरात बऱ्यापैकी होल्ड असतो. आम्ही साताऱ्यात शूट करतोय आणि इकडच्या वातावरणात शूट करताना खूप  मज्जा येत आहे. मला अजिबात अपेक्षा नव्हती की माझी निवड होईल कारण जेव्हा मला ऑडिशनबद्दल सांगितले गेले की हे पात्र साताऱ्याच आहे. भाषेतून सातारकर वाटलं पाहिजे आणि मी पुण्यात राहिली आहे. तर साताऱ्याची भाषा किंवा तो लहेजा जमेल की नाही याची धाकधुक होती. पण संधी सोडायची नव्हती म्हणून ऑडिशन द्यायला मी खास साताराला गेली होती. तिथे पोहोचल्यावर गर्दी पाहून मला वाटलं नव्हतं की माझं सिलेक्शन होईल." 

सूर्यादादा आणि बहिणींसोबतच्या नात्याबद्दल इशाने सांगितले की, एकदम खतरनाक नातं आहे आम्हा सर्वांचं पण सूर्यादादासोबत सगळ्यात घट्ट नातं आहे. माझा मूड खराब असेल किंवा माझ्या आयुष्यात काहीही गोष्ट घडत असेल तर मी आधी दादाला जाऊन सांगते कारण तो वयानी आणि अनुभवांनी माझ्यापेक्षा मोठा आहे. शूटिंग सुरु होऊन काहीच दिवस झालेत पण आम्हा चौघी बहिणींमध्ये जवळच नातं निर्माण झालं आहे. सेटवर सर्वात जवळची मैत्रीण जुई आहे कारण ती माझी रूममेट सुद्धा आहे, आम्ही रील्स वगैरे बनवायची प्लानिंग सुद्दा एकत्रच करतो. खऱ्या आयुष्यात मला सख्खा दादा नाही पण मला सख्खी बहीण आहे. मी लहानाची मोठी ज्यांच्याकडे झाली तिथे माझे दोन मानलेले भाऊ आहेत त्यांचं नाव प्रतीक दादा आणि अद्वैत दादा आहे. आता तितकंसं बोलणं आणि भेटणं होत नाही. पण खूप जवळच नातं आहे आमचं. एका घरात भावा- बहिणींसोबत राहणं हे मी ह्या मालिकेत अनुभवत आहे.

'लाखात एक आमचा दादा' ही माझी पहिली मालिका आहे, त्यामुळे माझ्या घरचे आणि मित्रपरिवार उत्साहित आहे. लहानपणापासून झी मराठी वाहिनीवरच्या मालिका पाहत मोठी झाले आणि आज जेव्हा स्वतःला झी मराठीच्या मालिकेत टीव्हीवर पाहतेय तो आनंद शब्दात व्यक्त  करू शकत नाही.  भावा-बहिणींच्या आयुष्यावर अशी मालिका पाहायला मिळाली नव्हती, या  मालिकेमध्ये एक नवेपण दिसून येतंय, असे ती म्हणाली.