Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'पेट पुराण'च्या टीमची धमालमस्ती, ललित प्रभाकर आणि ऋषी मनोहर सादर करणार स्कीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 12:53 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज पेट पुराण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज पेट पुराण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही पाळीव प्राण्‍यांचे पालनपोषण करण्‍यावरील उत्‍साहवर्धक सोशल कॉमेडी सिरीज आहे. हलक्या-फुलक्या सुखद क्षणांनी भरलेली आणि महाराष्‍ट्रीयन पार्श्‍वभूमीवर आधारित ही सिरीज शहरी, उदारमतवादी, विवाहित जोडपे अतुल व अदिती आणि त्‍यांचे दत्तक घेतलेले पाळीव प्राणी बाकू नावाची मांजर व व्‍यंकू नावाचा कुत्रा यांच्‍या अपारंपारिक, परिपूर्ण जीवनाला दाखवेल.

या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर आली आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि ऋषी मनोहर यांचं स्कीट रसिकांना बघायला मिळणार आहे.

'Pet पुराण' ह्या  सीरिजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आणि हे असं असताना या  सीरिजचा  चमू हास्यजत्रेत येणं ही सईसाठी आणि हास्यरसिकांसाठी पर्वणी असेल. हा विशेष भाग हास्यरसिकांना शुक्रवारी पाहता येणार आहे. सीरिजचा विषय वेगळा पण प्रेक्षकांना आवडणारा असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. मालिकेचा संपूर्ण  चमू काय धम्माल करणार, ललित आणि ऋषी यांच्याकडून लोकांना काय बघायला मिळणार.

टॅग्स :सई ताम्हणकरललित प्रभाकर