Join us

'हाय फिव्हर... डान्स का नया तेवर'च्या सेटवर लारा दत्ता झाली भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 5:30 AM

'पप्पा' हा शब्द कदाचित लहान असेल, पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन आणि तितकाच शक्तिशाली आहे.तुम्ही वडिलांना 'पप्पा' म्हणून मोठ्याने हाक ...

'पप्पा' हा शब्द कदाचित लहान असेल, पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन आणि तितकाच शक्तिशाली आहे.तुम्ही वडिलांना 'पप्पा' म्हणून मोठ्याने हाक मारता,तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील त्यांचे महत्त्व समजते. प्रत्येक मुलाचे त्यांच्या वडिलांवर असलेले प्रेम साजरे करत 'हाय फिव्हर' मंचावर फादर्स डे स्पेशल एपिसोडसह सर्वात स्पेशल व भावनिक क्षण साजरे करण्यात आले.अविरत प्रेमाला साजरे करत 'हाय फिव्हर... डान्स का नया तेवर' शोने लारा दत्ताला एक खास सरप्राईज दिले.एका हृदयस्पर्शी पत्राने तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या पत्रामधील तिच्या वडिलांच्या शब्दांनी लाराच्या बालपणीच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. लारा लहान असताना एकदा भारतीय सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये बसली असतानाची एक निरागस आठवण त्यांनी सांगितली.या आठवणीने प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला.तिच्या वडिलांच्या पत्रामध्ये लिहिले होते, ''जेव्हा तुला मिस युनिव्हर्सचा क्राऊन मिळाला, तेव्हा तू माझ्यासोबतच संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केलीस.संपूर्ण देश तुझे कौतुक करत होता, हे पाहून माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले.लारा, तू फक्त चेह-यानेच नव्हे, तर मनाने देखील खूप सुंदर आहेस. मला वाटते तुझ्यासारखी मुलगी सर्वांना असो,पण प्रत्येक जन्मामध्ये फक्त तुच माझी मुलगी असली पाहिजे.''ईशा गुप्ता हे पत्र वाचत असताना लाराच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येत होते. या पत्राने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना देखील भावनिक केले, त्यांनी टाळ्या वाजवून आपली भावना व्यक्त केली. आपले प्रेम व्यक्त करत आणि सर्व वडिलांना संदेश देत ती म्हणाली, ''माझे वडिलांसोबत दृढ नाते आहे. मला वाटते की मी माझ्या वडिलांची मुलगी नसून मुलगा आहे. माझे वडिल भारतीय वायूसेनेमध्ये होते आणि ते इंदिरा गांधी यांचे वैमानिक होते. ते तीन हार्टअटॅकमधून वाचले आहेत आणि त्यापैकी मी दोन हार्ट अटॅक मी प्रत्यक्षात पाहिले आहेत.माझ्यासाठी ते खरे फाइटर आहेत.त्यांनी मला कधीच हार न मानण्याची आणि आपल्या मार्गात येणा-या प्रत्येक आव्हानांचा सामना करण्याची शिकवण दिली.'' ती पुढे म्हणाली, ''वडिलांचे आपल्या जीवनात एक खास स्थान असते.आपण आज जे कोणी आहोत, ते केवळ त्यांच्यामुळेच आणि त्यांनी केलेल्या त्यागांमुळे. माझ्या वडिलांना आणि कुटुंबांचे प्रबळ आधारस्तंभ असलेल्या सर्व वडिलांना माझा सलाम.''