Join us

'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकाने सहकलाकारांसोबत ट्रेडिंग गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:58 IST

अक्षया नाईक हिने 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील काही कलाकारांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते ट्रेडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. नुकताच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील व्हिडीओ शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षया नाईक हिने 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील काही कलाकारांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती सध्या ट्रेंड होत असलेला मास्टर चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

अक्षयाने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्याआधी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत देखील काम केले होते. तसेच फिट इंडिया या चित्रपटात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सुंदरा मनामध्ये भरली ही तिची पहिली मालिका असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अक्षया ही निर्माते अरविंद नाईक यांची मुलगी आहे तर त्यांची दुसरी मुलगी देखील अभिनेत्री आहे.

अक्षया नाईक यापूर्वी हिंदी मालिकांमध्ये झळकली होती. ‘ढाई किलो प्रेम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या हिंदी मालिकांमध्ये अक्षया दिसली होती. याशिवाय तिने ‘अनटॅग’ या वेब सीरीजमध्येही काम केले आहे.

टॅग्स :अक्षया नाईक