रोजच्या जीवनशैलीचा वर्कआऊट करणे हा एक भाग बनला आहे, विशेषतः मनोरंजनाच्या जगातील लोकांसाठी. वर्कआऊटचे महत्व लक्षात घेऊन, आणि स्क्रीनवर चांगले दिसण्यासाठी तंदुरूस्त राहण्यासाठी, टेलिव्हिजन वरील अभिनेत्री लविना टंडनने तिच्या फिटनेससाठी किकबॉक्सिंगचा मंत्र निवडला आहे. पिळदार शरीरयष्टी मिळविण्यासाठी ती नियमीत किकबॉक्सिंगची मदत घेते आहे.
वर्कआऊट विषयी बोलताना, लविना टंडन म्हणाली, “मी शो मध्ये सुरीली नावाच्या विषकन्येची भूमिका करत आहे. विषकन्या या सामान्यतः मोहक आणि सुंदर स्त्रिया असतात. विषकन्येचा लुक येण्यासाठी माझी शरीरयष्टी तशी असणे महत्वाचे आहे. स्वसंरक्षण शिकविणारे दुसरे कोणतेतरी तंत्र शिकण्यापेक्षा मी किकबॉक्स क्लासला जाण्याचे ठरविले. किकबॉक्सिंगचा टोनिंग घटक खूप मोठा आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीराचे सर्व स्नायु व्यस्त राखतात. हे अतिशय चांगले वर्कआऊट आहे ज्यामुळे एका तासात ७५० कॅलरी कमी होतात. मला आधीपासूनच किकबॉक्सिंग करायचेच होते आणि अखेरीस मी ते करू लागले, त्याचा मला तंदुरुस्त राहण्यासाठी फायदा झाला आणि स्वतःला आव्हान देणाऱ्या कार्यक्रमात मी मला झोकून दिले आहे, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे कारण त्यामुळे मला काहीतरी मिळविल्यासारखे वाटत आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.”
रश्मी शर्मा टेलिफिल्मस द्वारे निर्मित, सितारा ही विषकन्येच्या दंतकथेवर आधारीत आहे. ही कथा सितारा नावाच्या एका तरुण मुलीच्या भोवती फिरत राहते, जिला स्वतःची विषकन्या म्हणून असलेली खरी ओळख माहित नाही. तिचे वडील तिला जन्म झाल्यानंतर लगेच तिच्या आई पासून लांब घेऊन जातात कारण त्यांना तिचे संरक्षण करायचे होते. पण ती मोठी होत असताना लवकरच तिला तिच्या शक्तींची जाणीव होऊ लागते आणि चांगले आणि वाईट यातील काहीतरी निवडण्यासाठीचा तिचा प्रवास सुरू होतो.