Join us  

मराठी मालिकांचा बोलीभाषांकडे ओढा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2016 12:09 PM

             बेनझीर जमादार                     ...

             बेनझीर जमादार
 
                                                       कोस कोस पर बदले पानी
                                                        दस कोस पर बदले वाणी
सध्या असचं काहीसं चित्र मराठी मालिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. मालिका ही नवीन असो वा जुनी सर्व मालिकेत बोलीभाषेचा रंगढंग पाहण्यास मिळतो आहे. असं म्हणतात की, महाराष्ट्रात कोसाकोसावर मराठी भाषा बदलताना दिसते. त्याचप्रमाणे मराठी मालिकांचे देखील आहे. जसजशा मालिका येतात त्यापद्धतीने त्या मालिकेतील मराठी भाषेचा तडका ऐकण्यास मिळत असतो. अशाच काही मराठी मालिकांचा घेतलेला आढावा.
१. तुझ्यात जीव रंगला - या मालिकेत कोल्हापुरी भाषेचा ‘रस्सा’ पाहायला मिळतो आहे. कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी. रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच असतो. या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी झालर असते. त्यामुळे इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. म्हणूनच प्रेक्षकांचा जीव फार कमी कालावधीत या मालिकेमध्ये रंगला असल्याचे दिसत आहे. 
 
२. माझ्या नवºयाची बायको - या मालिकेच्या नावानेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. त्यामुळे ही मालिका सुरू होण्यापूर्वीदेखील या मालिकेची चर्चा रंगली. या मालिकेत वैदर्भीय बोलीभाषा आहे. या भाषेनेदेखील प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. काही प्रेक्षक देखील ही बोलीभाषा मजेत बोलताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
३. नकुशी... तरीही हवीहवीशी! - या मालिकेनेदेखील खूप कमी कालावधीत प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. या मालिकेतदखील ग्रामीण भाषेचा तडका पाहायला मिळत आहे. मुलगाच हवा या आग्रहामागे मुलगी नको हे अलिखित विधान असतं. अशा वेळी मुलगी झाली की चक्क तिचं नावच नकुशी ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रिकरणदेखील सातारा, वाई, कुडाळ या ग्रामीण भागात झाले आहे.  
 
४. काहे दिया परदेस - या मालिकेनेदेखील फार कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहेत. तसेच  या मालिकेतील गौरीच्या आजीने कोकणी भाषा वापरत या मालिकेमध्ये रंग भरले आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 
 
५. रात्रीस खेळ चाले -  या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण या मालिकेतील नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील,अभिराम आणि अगदी महिन्याभरापूर्वी आलेला विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच त्यांची मालवणी भाषेनेदेखील प्रेक्षकांना प्रेमात पाडले होते.