Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणं माझ्यासाठी...', ओंकार भोजनेचं 'ते' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 3:59 PM

Onkar Bhojane : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोमधून अभिनेता ओंकार भोजने घराघरात पोहचला.

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय शोमधून अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) घराघरात पोहचला. काही महिन्यांपूर्वी ओंकार भोजनेची प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तो कलावती या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच ओंकार भोजनेने हास्यजत्रा सोडल्यानंतर त्याचे अनेक चित्रपट समोर येतात. त्यामुळे हास्यजत्रा सोडणे हे कुठेतरी लकी ठरले असे म्हणू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले.

ओंकार भोजने म्हणाला की, मी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणे लकी ठरले की नाही, असे आपण म्हणू शकत नाही. या चर्चेत काहीही तथ्य नाही. ते माझे एक काम आहे. मला हास्यजत्रेच्या मंचामुळे ओळख मिळाली. मी तिथे राहून अनेक गोष्टी शिकलो. त्यामुळे ते सोडणे माझ्यासाठी लकी कसे काय असू शकते? असा सवाल ओंकार भोजनेने उपस्थित केला.

तो पुढे म्हणाला की, मी जितका वेळ तिथे काम केले आहे. त्यात मी आनंदी आहे. त्यानंतर मला वेगळ्या कामासाठी त्यातून बाहेर पडावे लागले. तो एक क्रम होता. त्यामुळे लकी, अनलकी असे काहीही नाही. त्या उलट महाराष्ट्राची हास्यजत्रा, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, या सर्वांबरोबरचे माझे अनुभव हे माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून घडण्यासाठी खूप महत्त्वाचे होते.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा