काही महिन्यांपूर्वी कर्लस मराठीवर (Colors Marathi ) ‘लेक माझी दुर्गा’ (Lek Majhi Durga ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत वडिलांचा सतत तिरस्कार सहन करणाऱ्या दुर्गा आणि तिच्या आईची कहानी दाखवण्यात आली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकेतून आता वरदा पाटीलनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.
सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली. या मालिकेत हेमांगी कवी आणि सुशील इनामदार यांची मुख्य भूमिका आहे. मात्र आता हेमांगीने हि मालिकातून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिलीय. मालिका सोडताना हेमांगीने एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
''लेक माझी दुर्गा मधला माझा comfort zone तू होतास. अनेक वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखत होतो, एकमेकांची कामं पाहत होतो पण कधी एकत्र काम नव्हतं केलं, ते lmd मुळे शक्य झालं. Thanks @chandrakantlokare आम्हांला जोडी म्हणून cast केलंस! पहिल्या दिवसापासून rather पहिल्या scene, shot पासून एक अजीब understanding होतं आपल्यात बहुतेक जसं तू म्हणतोस तसं नाटकामुळे आलं असेल पण जे काही होतं ते कमाल होतं. कितीतरी वेळा dialouges वर खाली व्हायचे, एकमेकांच्या lines आपण बोलायचो पण आपण दोघांनी scene कधी सोडला नाही आणि बहुतेकवेळा तेच जास्त work झालेलं आहे. डोळ्यातून एकमेकांना सावरत उचलत scene मस्त complete करायचो. खूप मज्जा आली, तू कसा solid actor आहेस वगैरे असलं मी काहीही पांचट बोलणार नाहीए, तुला माहितेय ते! पण तुझ्या सोबतचा प्रत्येक दिवस, scene, आपल्या न संपणाऱ्या गप्पा आठवणीत राहणार! इतका हळवा पुरुष सह- कलाकार मी पाहिला नाही! मी project संपलं की लगेच dettached होणारी आहे तुला कळलं असेलच एव्हाना, तुला ही हे वरदान मिळो!
माझ्या शेवटच्या scene मध्ये तुझा फुटलेला बांध... मी कधीच विसरणार नाही! सुशील! आपण भेटणार पुन्हा भेटणार तो पर्यंत तुझ्या नवीन नाटकाला 'उध्वस्त धर्मशाळा' माझ्या कडून भरभरून शुभेच्छा! कुणी काही ही बोलू देत reels करायचं सोडू नकोस हाँ! ती आपल्या मैत्रीची निशाणी आहे, जप तिला! मैं तेनु फिर मिलांगी क्यूँकी मेरा नाम है हेमांगी!, अशा शब्दांत हेमांगीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेमांगीच्या या पोस्ट चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.