लेक माझी दुर्गा: पोटच्या पोरीला महेशने सोडलं गावाबाहेर; वैजूला ऐकू येईल का आपल्या मुलीची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:18 PM2022-02-24T19:18:50+5:302022-02-24T19:20:53+5:30

Lek Majhi Durga: कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तो वैजूचा विरोध झुगारुन दुर्गाला गावापासून दूर बाहेर जंगलात घेऊन जातो.

Lek Majhi Durga Mahesh left Durga outside the village | लेक माझी दुर्गा: पोटच्या पोरीला महेशने सोडलं गावाबाहेर; वैजूला ऐकू येईल का आपल्या मुलीची हाक

लेक माझी दुर्गा: पोटच्या पोरीला महेशने सोडलं गावाबाहेर; वैजूला ऐकू येईल का आपल्या मुलीची हाक

googlenewsNext

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे लेक माझी दुर्गा. आई आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. या मालिकेत अभिनेत्री हेमांगी कवी मुख्य भूमिका साकारत असून सध्या या मालिकेत रंजक वळण येत असल्याचं पाहायला मिळत आहे.  सतत दुर्गाचा तिरस्कार करणार महेश अखेर तिला गावाच्या बाहेर एकटीला सोडून देणार आहे.

दुर्गाचा जन्म झाल्यापासून महेश आणि त्याची आई तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी अनेकदा तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे वैजू कायम आपल्या लेकीला सोबत घेऊन फिरत असते. एकही क्षण ती दुर्गाला तिच्या नजरेआड होऊ देत नाही. परंतु, असं असतानादेखील महेश, दुर्गाला घेऊन कायमचा तिच्यापासून पाठ सोडवण्याचा प्रयत्न करतो.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तो वैजूचा विरोध झुगारुन दुर्गाला गावापासून दूर बाहेर जंगलात घेऊन जातो. इतकंच नाही तर रात्री अंधारात तो दुर्गाला एकटीला त्या भयान शांतता असलेल्या जागी सोडतो. त्यामुळे घाबरलेली दुर्गा मोठ्याने वैजूला हाक मारते. आता दुर्गाचा आवाज वैजूपर्यंत पोहोचेल का? आपली लेक कुठे आहे हे वैजूला कळेल का?कशाप्रकारे वैजू तिच्या लेकीला वाचवेल हे येत्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: Lek Majhi Durga Mahesh left Durga outside the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.