Join us

'देवमाणूस' मालिकेतील डिंपलचे वडील म्हणजेच बाबूच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:30 PM

'देवमाणूस' मालिकेत डिंपलच्या वडिलाची म्हणजेच बाबू दादा यांची भूमिका अभिनेता अंकुश मांडेकर यांनी साकारली आहे.

झी मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अजित कुमार देव, एसीपी दिव्या सिंह, सरकारी वकील आर्या, बजा, सुरू आजी हे आणि इतर पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत बाबू हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. या मालिकेत डिंपलच्या वडिलाची म्हणजेच बाबू दादा यांची भूमिका अभिनेता अंकुश मांडेकर यांनी साकारली आहे.

अंकुश मांडेकर यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपले करियर घडवले आहे. अंकुश यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले आहे. बीकॉम झाल्यानंतर ते पुण्यामध्ये नोकरी करण्यासाठी आले होते. मात्र, अभिनय आणि नाटक करण्याची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती. लहानपणी त्यांनी भारूडांमध्ये काम केले होते. याचा उपयोग त्यांना अभिनय क्षेत्रासाठी झाला.

सगळ्यात आधी त्यांना योगेश सोमण यांनी त्यांच्या सावकाराची जन्मठेप या नाटकामध्ये काम करण्याची संधी दिली. या नाटकामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 

सुरेश पाटोळे यांच्या मला जगायचंय या चित्रपटातून ते सगळ्यांसमोर आले. त्यानंतर झेंडा, स्वाभिमान, लादेन आला रे आला या सारख्या चित्रपटात देखील ते झळकले.

यानंतर त्यांनी जवळपास ४७ चित्रपटात काम केले. तसेच त्यांनी सात नाटकांमध्ये देखील काम मिळाले.

देव माणूस ही मालिका सातारा जिल्ह्यातील एका गावातील सत्यघटनेवर आधारित आहे. या गावामध्ये संतोष पोळ नावाचा बोगस डॉक्टर काही वर्षांपूर्वी अवतरला होता. त्याने अनेकांवर उपचार केले होते. यातील काही जणांना बरे वाटले. त्यांच्यासाठी तो देव माणूस झाला होता. मात्र, ज्या लोकांना त्याची नियत कळली होती. त्या लोकांना त्याने ठार करून जिवंत फार्महाऊसवर गाडले होते. या सत्यघटनेवर आधारित ही देव माणूस मालिका बेतलेली आहे.

टॅग्स :झी मराठी