कंगना रणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो 'लॉक अप' (Lock Upp) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शोमधील स्पर्धक अंजली अरोरा (Anjali Arora) चर्चेचा विषय ठरत आहे. अंजलीची खास बाब म्हणजे सोशल मीडियावर तिचे कंगनापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आता अंजलीने सर्व स्पर्धक आणि होस्ट कंगनासमोर आपल्या एका सीक्रेटचा खुलासा केला आहे. या सीक्रेटनंतर लोक तिला ट्रोलही करू लागले आहेत.
अंजली (Anjali Arora) ने 'लॉक अप' (Lock Upp) शोमध्ये सांगितलं की, गेल्यावर्षी ती रशियामध्ये गेली होती. त्यादरम्यान ती तिच्या हॉटेलच्या एका रिसेप्शनिस्टकडे आकर्षित झाली होती. तिने रिसेप्शनिस्टकडे पैसे मागितले आणि त्याच रिसेप्शनिस्टसोबत पार्टी केली.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कंगना अंजली अरोराला म्हणजे की तू तुझं सीक्रेट सांग. त्यानंतर अंजलीने सांगितलं की, 'डिसेंबरमध्ये मी रशियाला गेले होते. आतापर्यंत माझं कोणतंही रिलेशनशिप नव्हतं. कधीच काही नव्हतं. तर तिथे मी एका रिसेप्शनिस्टकडे अट्रॅक्ट झाले होते. मी रिसेप्शनिस्टकडून ५ हजार रूबल्स घेतले होते. तिथे सॅटेरडे नाइट होती तर रिसेप्शनिस्टने पार्टीसाठी विचारलं. मला पैसे पाहिजे होते तर मी मागितले आणि रिसेप्शनिस्टने दिले सुद्धा. मग आम्ही पार्टीला गेलो. हे माझ्या कोणत्याच मित्राला माहीत नाही. माहीत नाही आई-बाब हे पाहिल्यावर काय म्हणतील'.
आता सोशल मीडिया यूजर्सना हे सीक्रेट समजलंच नाही. याचा काय अर्थ आहे तोच समजला नाही. काही लोकांनी कमेंट केल्या. एक म्हणाला की, 'यात काय झालं. हे काय सीक्रेट आहे. पैसे तर कुणीही कुणाला मागतं'. एकाने कमेंट केली की, वाह काय सीक्रेट होतं. एकदम पंचतंत्राची कहाणी'.
एका कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स
अंजली अरोरा (Anjali Arora) 'लॉक अप' (Lock Upp) च्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिला १० मिलियन फॉलोअर्स आहेत. ज्यावर स्वत: कंगना हैराण झाली होती. याआधीच्या एपिसोडमध्ये कंगनाने अंजलीला विचारलं की, मला हे समजत नाहीये की, तुझे एक कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स कसे आहेत. तू असं काय करते जेणेकरून मी तुला फॉलो करावं. यानंतर अंजलीने परम सुंदरी गाण्यावर डान्स केला. मग तिने कंगनाला सांगितलं की, लोक तिच्या खूप प्रेम करतात आणि ती जे रील्स बनवते ते त्यांना खूप आवडता. कदाचित हेच कारण असावं.