Payal Rohtagi says she cannot get pregnant: कंगना राणौतचा ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो सतत चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक अनेक शॉकिंग खुलासे करत आहेत. मुनव्वर फारूखीनंतर आता अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिचा हा खुलासा ऐकून चाहतेही भावुक झालेत.मी कधीच आई बनू शकणार नाही, असं पायलने कॅमेऱ्यापुढे सांगितलं. हे सांगताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. ती ढसाढसा रडली.
म्हणून लग्न केलं नाही...मी कधीच आई बनू शकणार नाहीये. मी आयव्हएफ केलं पण त्यातही अपयश आलं. त्यामुळेच मी अद्याप बॉयफ्रेन्ड संग्राम सिंगसोबत लग्न केलेलं नाही. जेव्हा मी गरोदर राहील, तेव्हा लग्न करू,असं मी ठरवलं होतं. यासाठी मला मेंटली व फिजिकली फिट व्हायचं आहे. 4-5 वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय. पण सगळे प्रयत्न अपयशी ठरले. आता संग्रामला हे समजून घ्यावं लागेल आणि मला वाटतं की त्याला हे समजलं आहे की मी कधीच आई बनू शकत नाही. तू दुस-या कोणाशी तरी लग्न कर, जी तुला तुझं मुल देऊ शकते, असं मी अनेकदा संग्रामला म्हणते, असं सीक्रेट पायलने ‘लॉक अप’ या शोमध्ये उघड केलं.
पायल व संग्राम दोघंही 2011 पासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लिव्ह इनमध्ये राहत आहेत. दोघांनीही अद्याप लग्न केलेलं नाही. संग्राम नुकतंच ‘लॉकअप’मध्ये आला होता. यावेळी त्याने पायलसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पायल रोहतगी सारख्या स्वतंत्र आणि सशक्त मुलीला गमावण्याची जोखीम मी पत्करू शकत नाही, असं म्हणत त्याने लॉकमध्येच पायलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. हे पाहून पायल फारच आनंदी झाली होती. जुलैमध्ये पायलच्या वाढदिवशी लग्न करण्याचा संग्रामचा विचार आहे.