Join us

Lock Upp: देशातील एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत घालवली रात्र, तहसीन पूनावालांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 10:07 PM

Tehseen Poonawala News: कंगना राणौतच्या चर्चित ‘लॉक अप’ या शोमधून राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला हे बाहेर पडले आहेत. मात्र शो सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जीवनातील एक असे गुपित उघड केले, जे ऐकून कंगनाच नाही, तर लॉक अपमधील इतर कैद्यांनाही धक्का बसला.

मुंबई - कंगना राणौतच्या चर्चित ‘लॉक अप’ या शोमधून राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला हे बाहेर पडले आहेत. स्वामी चक्रपाणी यांच्यानंतर या शोमधून बाहेर पडणारे ते दुसरे स्पर्धक ठरले. एकता कपूरच्या या रियालिटी शोमध्ये गेल्या आठवड्यात तहसीन पूनावाला यांना सर्वात कमी मते मिळाली होती. त्यानंतर त्यांना शोमधून निरोप देण्यात आला. मात्र शो सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जीवनातील एक असे गुपित उघड केले, जे ऐकून कंगनाच नाही, तर लॉक अपमधील इतर कैद्यांनाही धक्का बसला.

तहसीन पूनावाला यांना लॉक अपमधून बाहेर पडण्यापूर्वी एका स्पर्धकाला वाचवण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यासाठी त्यांना एक किंमत मोजावी लागणार होती. ती म्हणजे तहसीन यांना त्यांचे सिक्रेट सांगावे लागणार होते. तहसीन पूनावाला यांनी साएशा शिंदेला वाचवले आणि एक गुपित जगासमोर आणले जे आतापर्यंत त्यांच्या पत्नीशिवाय कुणालाही माहिती नव्हते.

तहसीन पूनावाला यांनी सांगितले की, एकदा मला देशातील एका मोठ्या उद्योगपतीने आपल्या पत्नीसोबत एक रात्र घालवण्यास सांगितले होते. त्यासोबत त्या उद्योगपतीच्या काही अटी आणि फँटसीही होती. त्यासाठी सदर उद्योगपतीने एक संपूर्ण नाईट क्लब बूक केला होता. जेव्हा तहसीन या उद्योगपतीच्या पत्नीसोबत वेळ घालवत होते. तेव्हा हे उद्योगपती सर्व काही पाहत होते.

तहसीन पूनावाला यांनी सांगितले की, त्या उद्योगपतींची अट होती की, ते मी त्यांच्या पत्नीसोबत वेळ घालवत असताना पाहतील. या घटनेचा आता मला कुठलाही खेद वाटत नाही. तहसीन पूनावाला यांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर कंगनाने त्यांना विचारले की, तुम्ही हे सारे एन्जॉय केले होते का, तेव्हा तहसीन यांनी होकारार्थी उत्तर दिले. मात्र तहसीन यांनी त्या उद्योगपतींच्या नावाची वाच्यता केली नाही.

तहसीन पूनावाला यांच्या या दाव्यानंतर कंगनाने त्यांना विचारले की, हे त्यांच्या पत्नीला माहिती आहे का, तेव्हा तहसीन पूनावाला यांनी सांगितले की, हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा माझा विवाह झाला नव्हता. तसेच मी सुरुवातीलाच याबाबत तिला सांगितले.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीव्यवसाय