CoronaVirus: लॉकडाउनमध्ये एकता कपूर आली फोटोग्राफर्सच्या मदतीसाठी धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:38 PM2020-04-22T16:38:19+5:302020-04-22T16:38:51+5:30
लॉकडाउनमुळे फोटोग्राफर्सदेखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कोरोनो व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटांच्या शूटिंग देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत ज्यामुळे या उद्योगातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांसोबतच बॉलिवूडच्या फोटोग्राफर्ससमोरच्या अडचणी देखील वाढवल्या आहेत.
एकता कपूर या अडचणीच्या काळात उदारतेचा आणखी एक नवा आदर्श घालून देत फोटोग्राफर्ससाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या लॉकडाउनच्या दिवसात काम बंद असल्यामुळे फोटोग्राफर्सची परिस्थिती बिकट झाली आहे. एकता कपूरने या कठीण काळात फोटोग्राफर्स आणि त्यांच्या कुटुंबांच्या सहायतेसाठी, त्यांच्या बॅंक खात्यात काही ठराविक रक्कम ट्रान्सफर केली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी आणि मानव मंगलानी यांनी अन्य काही फोटोग्राफर्ससोबत एकत्र येऊन एकताला फोटोग्राफर्सना मदत करण्यासाठी दाखवलेल्या उदारतेसाठी धन्यवाद दिले आहेत.
चित्रपट उद्योगातील प्रत्येक घटकाला आवश्यक त्या मदतीसाठी एकताने नेहमीच पुढाकार घेतला आहे. या आधी देखील एकताने आपली कंपनी बालाजी टेलीफिल्म्सच्या आपल्या सहकाऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी संपूर्ण वर्षाचा पगार दिला आहे. यासोबतच, विविध सहाय्यता फंडांसाठी देखील मदत केली आहे.