लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित 'लोकमान्य' (lokmanya) ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीज दाते लोकमान्य टिळकांची भूमिका साकारत आहे. तर, अभिनेत्री स्पृहा जोशी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यामध्येच आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री लोकमान्य टिळकांच्या म्हणजेच कृष्णाची भूमिका साकारणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आता टिळकांची लेक कृष्णा मोठी होणार आहे. त्यामुळे कृष्णाच्या भूमिकेत एक नवीन अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अभिनेत्री सान्वी जांभेकर, मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणार आहे. नुकताच सान्वीचा या मालिकेतील फर्स्ट लूक समोर आला आहे. सान्वीच्या आईने तिचे मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, सान्वीने वेध अॅक्टींग अकॅडमी येथून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. लोकमान्य या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सान्वीची आईदेखील शास्त्रीय नृत्यांगणा आहे. त्यांचा स्वत:चा डान्स क्लास आहे. तसंच त्या मराठी सिनेइंडस्ट्रीत कोरिओग्राफर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.