Join us

पुण्यात लावणीचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2016 8:52 AM

  महिन्यांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोची सुरुवात झाली. या कार्यक्रमानिमित्त प्रेक्षकांनी अस्सल लावणीचा बाज वेगवेगळ्या प्रयोगांसोबत ...

  महिन्यांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोची सुरुवात झाली. या कार्यक्रमानिमित्त प्रेक्षकांनी अस्सल लावणीचा बाज वेगवेगळ्या प्रयोगांसोबत अनुभवला. पहिल्या भागातच लावणीचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅश मॉब सादर करण्यात आले आणि त्यातून स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांशी करून देण्यात आली. हल्लीच पुण्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा लावणी ठसका अनुभवायला मिळाला. निमित्त होते ते कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर कार्यक्रमातील अंतिम फेरीतील ५ पैकी 3 स्पर्धकांची आपापल्या घरी दिलेली भेट. यामध्ये शुचीका जोशी,वैष्णवी पाटील व  मृण्मयी गोंधळेकर  यांचा समावेश आहे. या तिघींनी ही पुण्यातील आपआपल्या परिसरात लावणीचा जल्लोष केला. मूळ कर्नाटकची, पुण्यात वारजे येथे राहणारी शुचीका जोशी ही ढोलकीच्या मंचावरची सर्वात लहान लावण्यवती आहे. आपल्या घरी भेट द्यायला खास बग्गीतून तिला आणण्यात आले. त्या नंतर तिने तिच्या कॉलनीमधील आवारात लावणी सादर केली. वय वर्ष १६ असलेली पण डांस रियालिटी शोचा सर्वात जास्त अनुभव असलेली कोथरूड येथे राहणारी वैष्णवी पाटील हिने खुल्या जीप मधून घरी भेट दिली. तिचे स्वागत नादब्रह्म ढोल पथकाच्या गजरात व्हावे अशी तिची इच्छा होती आणि ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमानिमित्त तिची ही इच्छा पूर्ण झाली. तिने तिच्या घराखाली म्हणजेच वनाज कॉर्नर येथे लावणी सादर केली. अस्सल पुणेरी थाटात मिरवणारी मृण्मयी गोंधळेकर ढोलकीच्या मंचावरची सर्वात डॅशिंग लावण्यवती आहे. घरच्यांची भेट घ्यायला टी चक्क बुलेट वरून आली. तिने आकुर्डी रेल्वे स्थानाकाशेजारी आपल्या बिल्डींग खाली लावणी सादर केली. अशा या तीन लावण्यवतींने लावणी नृत्याने पुणे दणाणून सोडले.