Join us

राजस्थानच्या जावेद खानच्या आयुष्यात झाली जादू, चाळीत राहणारा तरुण बनला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 8:56 PM

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड वासडापासून मुंबईतील मालाडच्या पठाणवाडीतील चाळ ते इंडियाज गॉट टॅलेंटचा विजेता असा जावेदचा प्रवास थक्क करणारा असाच होता.

छोट्या पडद्यावरील रियालिटी शो इंडियाज गॉट टॅलेंटचे जेतेपद एका चाळीत राहणाऱ्या मुलाने पटकावले आहे. जावेद खान असं त्याचे नाव असून त्याने एकाहू एक सरस जादूचे प्रयोग दाखवत विजेतेपदाला गवसणी घातली. एका छोट्या गावात राहणाऱ्या जावेदचा प्रवास सोपा सोपा नव्हता. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड वासडापासून मुंबईतील मालाडच्या पठाणवाडीतील चाळ ते इंडियाज गॉट टॅलेंटचा विजेता असा जावेदचा प्रवास थक्क करणारा असाच होता.

विजेतेपद पटकावल्यानंतर जावेदला ट्रॉफीसोबत २५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे. यासोबतच मारुती सुजुकी कारही त्याला गिफ्ट देण्यात आली आहे. जावेद इतरं आभाळाएवढं यश मिळवेल अशी त्याच्या कुटुंबीयांनाही कल्पना नव्हती. पाचवीत असताना त्याचा साखरपुडा झाला होता. कॉलेजच्या काळात साखरपुडा मोडला. नियोजित सासरच्या लोकांना त्याने तीन-चार वर्षांनंतर लग्न करेल असं सांगितले होते. मात्र त्यांना हे मान्य नव्हतं आणि आपल्याबाबत खोट्या गोष्टी पसरवल्याचे त्याने सांगितले. मुंबईमध्ये दुसऱ्याच एका मुलीसोबत लग्न झाले आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यामुळे कुटुंबीयांचा विश्वास उडाल्याचे तो म्हणतो. यामुळे नैराश्यात गेल्याचंही जावेदने सांगितले.

यानंतर स्वतःचा छंद आणि इंजिनिरिंगच्या शिक्षणाचा वापर करत जादू शिकला. त्याच्या जादूला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.  स्वतःला सिध्द केल्यानंतर, त्या मुलीचे नातेवाईकही आपल्या बाजूने आले आणि कुटुंबीयांचंही पाठबळ मिळाल्याचे जावेद सांगतो. जावेद आपल्या पालकांचे आयुष्य सुधारणार आहे. तो त्यांच्यासाठी घर खरेदी करणार आहे. तो यासोबतच अंधेरीत एका आयटी कंपनीत नोकरीही करतो. आगामी काळात नोकरी सांभाळात जादूच्या कलेत मोठं नाव कमावण्याचे त्याचे स्वप्न आहे.

टॅग्स :मलायका अरोरा