‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे (MaharashtraChi Hasya Jatra) घराघरात पोहोचलेला विनोदवीर निखील बने (Nikhil Bane) आता नवी इनिंग सुरू करतोय. निखीलने एक नवी सुरूवात केली आहे. एक व्हिडीओ शेअर त्याने याबद्दल माहिती दिली आहे. निखीलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या मित्रांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो निखील खरेदी करताना दिसतोय. आता खरेदी कसली तरी नव्या पीसी सेटअपची. नवा पीसी सेटअप कशासाठी तर, नवं काही शिकण्यासाठी. होय, निखीलने नुकतंच स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि त्यासाठी त्याला एडिटींग शिकायचंय आणि यासाठीच त्याने नवा पीसी सेटअप घेतला आहे.
“एका नव्या वाटचालीची सुरुवात करतोय, एडिटिंग शिकण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन pc setup घेतला. आशिर्वाद राहुद्या.. खूप खूप धन्यवाद तुषार… तुझ्यामुळे शक्य झालंय हे”, असे निखीलने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. त्यात त्याने एडिटींग, फोटोशॉप शिकण्याच्या आवडीबद्दल सांगितलं आहे. “मला कॉलेजपासूनच एडिटिंग, फोटोशॉप हे शिकण्याची आवड होती. पण ते कधीही शिकता आलं नाही. पण आता स्वत:चे युट्यूब चॅनल सुरु केलंय, त्यानिमित्ताने ते नक्कीच शिकता येईल आणि घरात एक कॉम्प्युटर देखील येईल. मला त्यावर एडिटिंग, प्रिमिअर प्रो, आफ्टर इफेक्टस अशा बऱ्याच गोष्टी शिकता येतील,” असं तो व्हिडीओत म्हणतोय.निखील अभिनयाच्या जोरावर नावारुपाला आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ त्याने गाजवलं. अलीकडे त्याने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलद्वारे तो विविध व्लॉग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शिवाय त्याच्या खासगी आयुष्याबाबत माहितीही देताना दिसतो.