Join us

लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ हास्यजत्रेतील कलाकारांचा भन्नाट डान्स; 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 10:31 IST

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ हास्यजत्रेतील कलाकारांचा भन्नाट डान्स; 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले, पाहा व्हिडीओ

Samir Choughule : प्रेम कधीही, कुठेही आणि कुठल्याही वयात होऊ शकतं... अशाच हटके आणि मजेशीर प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'गुलकंद' चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. अलिकडेच गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला त्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. शिवाय या चित्रपटातील गाणीसुद्धा अनेकांच्या ओठांवर आहेत. अशातच याच निमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील 'गुलकंद' चित्रपटातील ट्रेंडिंग असलेल्या प्रेमाचा गुलकंद गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अल्पावधीतच हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरजवळ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी प्रेमाचा गुलकंद गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. अभिनेते समीर चौघुले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "प्रेमाचा गुलकंद with MHJ फॅमिली at Times Square.आता 1 मे ला गुलकंद बघायला सहकुटुंब यायचं आणि खळखळून हसायचं...", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हास्यजत्रेतील कलाकारांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान,समीर चौघुले यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नम्रता संभेराव, ईशा डे, चेतना भट तसेच प्रभाकर मोरे रसिका वेंगुर्लेकर यांसारखे कलाकार डान्स करताना दिसत आहे. 

दरम्यान, प्रेमाचा गुलकंद या सिनेमात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले आणि ईशा डे हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :समीर चौगुलेनम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्रासोशल मीडिया